-
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा एखाद्या राशीत ग्रहांची युती होते. ग्रहांचा राजा सूर्यदेव लवकरच राशी बदलणार आहे.
-
१३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजून ५१ मिनिटांनी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे. सूर्यदेवाच्या या राशी बदलामुळे सुर्य आणि गुरुची युती होणार आहे.
-
ही युती अतिशय शुभ मानण्यात येते. सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो तर गुरू हा भाग्य, वृद्धी आणि ज्ञानाचा कारक आहे.
-
अशा स्थितीत या दोघांचा संयोग मेष राशीत होणार आहे. त्यामुळे काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
या राशीच्या लोकांसाठी गुरू आणि सूर्याचा योग खूप खास ठरु शकतो. या राशीच्या लोकांसाठी ही युती शुभ आणि फलदायी ठरु शकते, कारण ही युती तुमच्याच राशीत होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात नफा मिळण्याची चांगली शक्यता आहे.
-
मिथुन राशीच्या लोकांना गुरु आणि सूर्य यांच्या संयोगाने विशेष लाभ होऊ शकतो. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना यावेळी भरपूर नफा मिळू शकतो.
-
सूर्य-गुरूच्या युतीमुळे सिंह राशीच्या लोकांसाठी फायदाच होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. नोकरी व्यवसायात घवघवीत यश मिळू शकतो. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. सुख सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम) )

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला