-
सगळ्याच गृहिणी भाज्या बनवताना त्यात वेगवेगळ्या प्रकारचे सॉस, मसाले टाकत असतात. भाजीची चव वाढवण्यासाठी त्या नेहमी सॉस, मसाले वापरतात. (फोटो : Freepik)
-
हे मसाले जेवणाची चव वाढवत असले तरी ते आरोग्यासाठी हानिकारक तर नाही याची खात्री करून घेतली पाहिजे (फोटो : Freepik)
-
तुम्हाला आठवतंय का, तुम्ही कधी दुकानातून सॉस घेताना सॉसच्या बाटलीची मागची बाजू पाहिली आहे? घटकांचे लेबल तपासले आहे का? नाही ना… ? (फोटो : Freepik)
-
हे लेबल योग्यरित्या वाचणे खूप महत्वाचे आहे. लेबलमध्ये सामान्यतः प्रथिने, चरबी, फायबर सामग्री, कार्बोहायड्रेट्स यांचा उल्लेख असतो.(फोटो : Freepik)
-
शुगर-फ्री म्हणून मार्केटिंग केलेली उत्पादनं तुम्ही कितीतरी वेळा विकत घेतली असतील. पण, ती खरंच शुगर-फ्री आहेत का हे तपासा(फोटो : Freepik)
-
तुमच्या आहारात सॉस तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या चटपटीत मसाल्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवले पाहिजे.(फोटो : Freepik)
-
प्रत्येकवेळी तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये हे सॉस टाकता तेव्हा तुमच्या शरीरात चवीसोबतच फॅट्सही जातात, हे लक्षात ठेवा. (फोटो : Freepik)
-
तुमच्या शरीराचे जास्त नुकसान होते. त्यामुळे फॅटी लिव्हर, खराब त्वचा आणि केस, हृदयविकार, नैराश्य, चिंता इत्यादींशी संबंधित समस्या होऊ शकतात.(फोटो : Freepik)
-
निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेची सामान्य पातळी ९० ते १०० mg/dL दरम्यान असते. जर एखाद्याने निरोगी आहार आणि जीवनशैलीचे पालन केले तर साखरेची सामान्य पातळी राखणे सहज शक्य आहे.(फोटो : Freepik)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक