-
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कर्करोग हा जगातील सर्वात मोठा मारक ठरत आहे.
-
बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती अशा अनेक गोष्टींमुळे जगभरात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. जीवघेण्या कर्करोगाच्या रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ पहायला मिळत आहे.
-
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कर्करोग एजन्सीने अंदाज वर्तवला आहे की, २०५० पर्यंत नवीन कर्करोगाच्या रुग्णांची संख्या तब्बल ७७ टक्क्यांनी वाढेल.
-
इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरसी) नुसार २०५० पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या ३५ दशलक्षांपेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
अशा गंभीर प्रसंगी आपण आपल्या आरोग्याची स्वतः काळजी घ्यायला हवी. यासाठी आपल्या शरीरात दिसणाऱ्या लहान लहान बदलांकडे पूर्ण लक्ष द्यायला हवे. कदाचित हे बदल भविष्यातील गंभीर आजारांची लक्षणे असू शकतात.
-
फुफ्फुसाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे दिसत नाहीत, पण शरीरातील काही बदलांकडे लक्ष दिल्यास हा आजार सहज ओळखता येऊ शकतो.
-
ब्रिटनच्या कॅन्सर रिसर्च टीमच्या मते, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या ७९ टक्के प्रकरणांमध्ये, या आजाराची लक्षणे वेळेत ओळखता आल्यास हा रोग उपचाराने बरा होऊ शकतो.
-
फुफ्फुसाच्या कर्करोगाची अनेक कारणे असू शकतात जसे की आनुवंशिकता, वय, जास्त धूम्रपान, कौटुंबिक इतिहास, खराब खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली, इत्यादी.
-
फुफ्फुसाच्या कर्करोगाला सायलेंट किलर असेही म्हणतात. हा आजार साधारणपणे ते दोन प्रकारचा असतो. नॉन-स्मॉल सेल कार्सिनोमा (NSCLC) आणि स्मॉल सेल कार्सिनोमा (SCLC).
-
सामान्यतः दिसणारी लक्षणे फुफ्फुसाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. जसे की तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत खोकला, छातीत तीव्र संसर्ग.
-
खोकल्याबरोबर रक्त येणे, श्वास घेताना किंवा खोकताना रक्त येणे, सतत थकवा जाणवणे ही देखील त्याची लक्षणे असू शकतात.
-
वजन कमी होणे, भूक न लागणे, चेहरा किंवा मानेवर सूज येणे, घसा बसणे, छातीत कळ येणे ही त्याची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता कृपया तज्ञांचा सल्ला घ्यावा.

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या