-
लांबसडक, दाट आणि सुंदर केस प्रत्येकालाच हवे असतात, मग ती महिला असो वा पुरुष.
-
मात्र हल्ली प्रत्येकजण केसगळतीच्या समस्येने हैराण आहे. अशापरिस्थितीत बाजारात उपलब्ध महागडी उत्पादने वापरुनही काही परिणाम होत नाही.
-
त्यामुळे आम्ही तुम्हाला नैसर्गिक पदार्थांचा वापर घरच्या घरी हेअर सीरम कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
-
यामुळे काही दिवसांत तुम्हाला केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
-
तांदूळ आणि कांद्यामध्ये काही गोष्टी मिक्स करुन तुम्ही हे हेअर सीरम घरीच बनवू शकता. हेअर सीरम बनवण्यासाठी ४ चमचे तांदूळ आणि २ टेबलस्पून मेथीचे दाणे घ्या.
-
सीरम तयार करण्यासाठी आपल्याला १.५ चमचे कांद्याच्या बिया आणि ४ ग्लास पाणी आवश्यक आहे.
-
हेअर सीरम बनवण्यासाठी तांदूळ साधारण २ दिवस पाण्यात भिजत ठेवा. आता तांदळाचे पाणी गाळून ग्लासमध्ये काढा.
-
आता मेथीचे दाणे आणि कांद्याच्या बिया घालून पुन्हा एक दिवस भिजत ठेवा. तुमच्या लक्षात येईल की, एक चिकट सीरम तयार झाले आहे. तुम्ही त्यात थोडेसे खोबरेल तेल मिक्स करा.
-
तेलाचे प्रमाण खूप कमी ठेवा. म्हणजे फक्त ७-८ थेंब तेल घाला. आता ते एका बाटलीत स्टोर करा. केस धुतल्यानंतर थोडेसे ओलसर असल्यावर हे सीरम केसांवर स्प्रे करा.
-
एकाच वेळी जास्त सीरम केसांना लावू नका. तुम्ही ते तुमच्या हातावर घेऊन हलके लावू शकता.
-
केसांच्या मुळांपर्यंत हे सीरम पूर्णपणे लावा. यामुळे काही दिवसात तुमचे केस गळणे कमी होईल. (photo credit – freepik)

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर