-
चेहऱ्यावर मुरुम, काळे डाग घालवण्यासाठी तसेच ग्लोइंग स्कीन मिळवण्यासाठी बहुतांश लोक अथक प्रयत्न करतात, पण खूप प्रयत्न करूनही अनेकदा कोणताही फरक दिसून येत नाही.
-
बरेचदा चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्यास फायदा होऊ शकतो असे सांगितले जाते. परंतु हे खरंच फायदेशीर आहे का? आज आपण चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे आणि तोटे सविस्तर जाणून घेऊया.
-
नियमित बर्फाने मसाज केल्यामुळे त्वचेवर तेज येते. स्कीन निरोगी आणि चमकदार दिसू लागते. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमसुद्धा दूर होतात.
-
बर्फाचा मसाज केल्यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होऊ शकते. मुरुमाचे डागही हळू हळू कमी होऊ शकतात.
-
वेगवेगळ्या कारणांमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात. हे डार्क सर्कल घालवण्यासाठी बर्फाचा वापर करता येईल. बर्फ लावल्याने डार्क सर्कल कमी होऊन डोळ्याची सूजसुद्धा कमी होते.
-
अनेकदा उन्हात गेल्यामुळे त्वचेवर खाज येते आणि जळजळ होते. पण चेहऱ्यावर बर्फाचा मसाज केल्यानंतर आराम मिळू शकतो.
-
आइस फेशियलचे अनेक फायदे असते तरीही त्याचा योग्य पद्धतींने अवलंब न केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. बर्फाचा तुकडा उष्णतेपासून आराम देतो, परंतु त्याचे काही नुकसान देखील आहेत.
-
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बर्फाचे तुकडे त्वचेवर जास्त वेळ घासल्यास त्वचेवर कोरडेपणा येऊ लागतो. एवढेच नाही तर त्वचेवरील छिद्रांचेही मोठे नुकसान होते.
-
ज्या लोकांना उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी सतत त्वचेवर बर्फ चोळण्याची सवय असते, त्यांना कालांतराने पुरळ उठणे किंवा खाज येण्याची समस्या उद्भवते.
-
ज्या लोकांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर त्वचेवर बर्फ अजिबात चोळू नये. तज्ज्ञांच्या मते या चुकीमुळे डोकेदुखी होऊ शकते. असे म्हटले जाते की त्वचेच्या पेशी खराब झाल्यामुळे असे होते.
-
जर तुम्हाला बर्फाने चेहऱ्याची काळजी घ्यायची असेल तर त्यासाठी योग्य पद्धत अवलंबा. त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी टोमॅटोच्या रसाचा बर्फ गोठवा. फक्त १ मिनिट चेहर्यावर चोळा आणि नंतर फेकून द्या.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos: Freepik)

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS