-
उन्हाळा सुरू झाला की शरीराला गारवा देण्याऱ्या पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढते.
-
उन्हाळ्यात लोक ऊसाचा, कोल्ड ड्रिंक्स, आइस्क्रीम खाण्याला पसंती देतात.
-
लहानांपासून अगदी वृद्ध लोकांपर्यंत सर्वजण आइस्क्रीम हा पदार्थ खूपच आवडीने खातात. मात्र आइसक्रीम खाल्ल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
-
मात्र, उन्हाळ्यात हे पदार्थ खाण्यापूर्वी त्याने शरीराला होणारे फायदे तोटे जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे.
-
आइस्क्रीम खाल्ल्यानंतर विशिष्ट पदार्थ खाणे टाळावे. असे न केल्यास आरोग्याला अपाय होऊ शकतो. हे पदार्थ कोणते आहेत, ते जाणून घेऊया.
-
आइस्क्रीम खाल्ल्यानंतर कॉफी, चहा, सूप असे गरम पदार्थ खाऊ नयेत. यामुळे खोकला, पोटदुखी, घसा दुखणे, घशात खवखव अशा समस्या जाणवू शकतात.
-
आइस्क्रीम खाताना किंवा त्यानंतर आंबट फळेही खाऊ नयेत.
-
आइस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. यामुळे अपचन, जळजळ असा त्रास जाणवू शकतो.
-
आइस्क्रीम खाल्ल्यानंतर मद्यपान करू नये. यामुळे आइसक्रीममधील दुधाचे पचन होण्यास त्रास होऊ शकतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos : freepik)

पैसाच पैसा! ५० वर्षानंतर सूर्याच्या राशीमध्ये निर्माण होईल त्रिग्रही योग, कोणाचे पालटणार नशीब अन् कोणाची होणार प्रगती, जाणून घ्या