-
आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणं गरजेचं आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण वेळेवर करणे गरजेचं आहे. (फोटो : Freepik)
-
शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बदाम खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळे तज्ज्ञ नियमित बदाम खाण्याचा सल्ला देतात. मात्र, आपण खातो ते बदाम हे खरंच चांगले आहेत की नाही याची चाचपणी करणं हे महत्त्वाचे असते.(फोटो : Freepik)
-
कित्येकदा आपल्याला हे समजूनच येत नाही की आपण खात आहोत ते बदाम चांगले आहेत की नाही. बदाम खराब झालेले नाही त्यातून ते खरे आहेत ना याची आपल्याला माहिती करून घेणे आवश्यक असते.(फोटो : Freepik)
-
परंतु काळजी करू नका, ही भेसळ ओळखता येते आणि आपल्याला अशी बनावट बदामं खाण्यापासून आपला बचाव करता येतो. तेव्हा या लेखातून आपण सविस्तर जाणून घेऊया.(फोटो : Freepik)
-
रंगावरून ओळखा – जर तुमचे बदाम हे बनावट आहेत तर तुमच्या समोर असलेल्या बदामांचा रंग हा नेहमीच्या बदामापेक्षा डार्क असतो. त्यातून याचा चवीवरही परिणाम होतो. बदामांचा रंग हलका तपकिरी असतो आणि त्यांचा आकार थोडा लांब आणि गोल असतो.(फोटो : Freepik)
-
सालावरून ओळखा – जर का तुमच्या बदामाचे साल हे पटकनं निघत असेल तर समजा की तुमचे बदाम हे बनावट आहेत.खऱ्या बदामाची चव गोड असते.(फोटो : Freepik)
-
तेल निघतंय? – कागदावर घेऊन झाल्यावर बदामांतून जर का तेल निघत असेल तर समजा हे बदाम फेक आहेत.(फोटो : Freepik)
-
बदामाच्या पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात भरपूर फायबर असते. याशिवाय यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ई, कॉपर, फॉस्फरससह मॅग्नेशियम देखील असते.(फोटो : Freepik)
-
दुसरीकडे, शेंगदाण्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात व्हिटॅमिन बी, थायामिन, व्हिटॅमिन बी6, बी9, अँटीऑक्सिडंट्ससह अनेक खनिजे असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.(फोटो : Freepik)

फुप्फुसांना चिकटलेली सगळी घाण लगेच होईल स्वच्छ; कफही नाही होणार, फक्त कोमट पाण्यात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या