-
जगभरात थायरॉईड हा आजार सामान्य बनत चालला आहे. भारतातही थायरॉईडच्या आजाराचे निदान झालेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे.
-
थायरॉईड ग्रंथी मानेच्या तळाशी असतात आणि शरीरातील चयापचय नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करतात. थायरॉईड ग्रंथी कमी सक्रिय झाल्यामुळे हायपोथायरॉईडीझम होतो, तर थायरॉईड संप्रेरकाच्या अतिउत्पादनामुळे हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो.
-
थायरॉईडचे सुप्त थॉयरॉईड (हायपो थायरॉइडीझम) किंवा जागृत थायरॉईड (हायपर थायरॉडिझम) असे दोन प्रकार असून, ते व्यक्तीला आयुष्यात कोणत्याही वयात होऊ शकतात.
-
थॉयरॉईड हा आजार त्याच्या लक्षणांमुळे अतिशय सामान्य वाटतो. थकवा, वजन वाढणे किंवा कमी होणे आणि मूड बदलणे अशा लक्षणांमुळे हा आजार लगेचच कळून येत नाही. म्हणूनच थायरॉईडच्या आरोग्याशी संबंधित लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
-
थायरॉईडवर वेळेवर उपचार न केल्यास त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. हा आजार असल्यास वजनात बदल आणि मानेवर सूज येण्याची लक्षणेही दिसू लागतात.
-
थायरॉईड या आजारातील सर्वात महत्त्वाच्या लक्षणांपैकी एक असलेले लक्षण म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय वजन वाढणे किंवा कमी होणे. हायपोथायरॉईडीझम आपले चयापचय मंद करू शकते. त्यामुळे वजन वाढू शकते.
-
याउलट हायपरथायरॉईडीझम आपली चयापचय गती वाढवू शकते. त्यामुळे वजन कमी होऊ शकते. आहारात किंवा शारीरिक हालचालींमध्ये कोणताही बदल न करता तुमच्या वजनात लक्षणीय बदल दिसून आल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-
रात्रभर झोपूनही तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल आणि अशक्तपणा वाटत असेल तर ही थायरॉईडची समस्या असू शकते. हायपोथायरॉईडीझममुळे अनेकदा थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवते. त्यामुळे स्नायूंमध्येही वेदना जाणवतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos: Freepik)

न्या.गवईंनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलले मोठे पाऊल….