अनेकदा लोकांचा दिवस हा चहा किंवा कॉफीने सुरु होते. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन जास्त प्रमाणात आढळते. सतत किंवा अवेळी चहा आणि कॉफीचे प्यायल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊया जास्त प्रमाणात चहा आणि कॉफीचे आरोग्यावर होणारे परिणाम. चहा आणि कॉफीमध्ये आढळणारे कॅफिन आरोग्यसाठी हानिकारक मानले गेले आहे. यासाठी, चहा आणि कॉफीचे नियंत्रित सेवन गरजेचे आहे. जास्त प्रमाणात चहा आणि कॉफी प्यायल्याने शरीरात तणाव वाढतो. यामुळ तणावामुळे हृदयासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. कॅफिन हे आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रण देते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील रक्तवाहिन्या कमकुवत होतात. कॉफीचे अधिक सेवन शरीरात पचन समस्या वाढवतात आणि यामुळे ऍसिडिटीचे प्रमाण देखील वाढते. कॉफी आणि चहाचे अधिक सेवन हे झोपेच्या समस्या वाढवते. कॅफिनमुळे झोपे चक्र विस्कळीत होते, ज्यामुळे झोप अपूर्ण राहू शकते. चहाच्या अधिक सेवनामुळे शरीरात उच्च रक्तदाबाचा त्रास होते. अधिक माहितीकरिता तज्ञांच्या सल्ला घ्या. (Photos:Unsplash)