-
सुक्या मेव्यामध्ये अक्रोड आरोग्यासाठी खूप उपयोगी असून यामध्ये जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. (फोटो : Freepik)
-
अक्रोड हे पोषक तत्वांनी युक्त एक अतिशय पौष्टिक ड्रायफ्रूट आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि इतर अनेक आवश्यक गोष्टी आढळतात ज्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. (फोटो : Freepik)
-
अक्रोड खाण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.उन्हाळ्यात अक्रोड पाण्यात भिजवून खावे. यामुळे अक्रोड अधिक पौष्टिक बनते आणि उष्णता दूर होते.(फोटो : Freepik)
-
तुम्ही रोज २-३ अक्रोड खाऊ शकता. मुलांना दररोज एक अक्रोड तुम्ही देऊ शकता. जास्त अक्रोड खाल्ल्याने समस्या निर्माण होऊ शकतात.(फोटो : Freepik)
-
उन्हाळ्यात भिजवलेले अक्रोड खावे. यामुळे उष्णता दूर होते आणि पौष्टिक घटक वाढतात. अक्रोड रात्रभर स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी भिजवलेले अक्रोड खा(फोटो : Freepik)
-
सुक्या मेव्यामध्ये अक्रोड हे औषधी गुणधर्माने भरपूर असते. कोलेस्टेरॉल कमी करणे, मेंदूची शक्ती वाढवणे, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे, कर्करोग, मधुमेह यांसारख्या आजारांचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होतो.(फोटो : Freepik)
-
अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा ३, फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात जे मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करतात.(फोटो : Freepik)
-
अक्रोड खाल्ल्याने त्वचा मऊ राहते. त्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि कोमल ठेवायची असेल तर रोज अक्रोड खा. यामुळे तुम्हाला सुंदर आणि निरोगी त्वचा मिळेल.(फोटो : Freepik)
-
हल्ली लठ्ठपणाच्या समस्येने सगळेच हैराण झाले आहेत. वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम यात समतोल राखणे आवश्यक आहे. (फोटो : Freepik)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”