-
जर तुम्ही वयाच्या विसाव्या वर्षाापासून चांगल्या आहाराच्या सवयी अंगीकारत असाल तर याचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होईल. तुम्ही तुमच्या आहारात सर्व प्रकारची फळे, भाजीपाला, कडधान्ये, प्रोटिनयुक्त आणि चांगला फॅटयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. या आहारातून तुम्हाला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मिळतील, जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (Photo : Freepik)
-
याशिवाय शेंगा, सुका मेवा, बिया आणि टोफू इत्यादी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी आणि हृदयाशी संबंधित आरोग्याचा धोका टाळण्यासाठी मदत करू शकते. तसेच आहारात सॅच्युरेडेट फॅट्स, ट्रान्स फॅट्स, कोलेस्ट्रॉल, सोडियम आणि साखरेचे प्रमाण कमी घ्या; नाहीतर रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढू शकते. (Photo : Freepik)
-
नियमित १५० मिनिटे एरोबिक व्यायाम करणे गरजेचे आहे. एरोबिक व्यायाम म्हणजे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवणारा प्रकार होय. हा व्यायाम केल्याने हृदयाची गती वाढते. यामुळे हृदय, फुप्फुस आणि रक्ताभिसरण क्षमता वाढते. (Photo : Freepik)
-
जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर त्याचे व्यसन लागण्यापूर्वी विशीत ही सवय मोडणे खूप सोपी जाते. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे कार्य बिघडते. रक्तदाब आणि हृदय गती वाढते, रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. याशिवाय स्ट्रोक आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. (Photo : Freepik)
-
हृदयाशी संबंधित आजार वाढण्यामागे वजन वाढीची समस्या धोकादायक ठरते. आपले सामान्य वजन आपली उंची, शरीर रचना, स्नायूंचे वजन आणि एकूण आरोग्यावर अवलंबून असते; त्यामुळे वजनाबरोबर निरोगी जीवनशैलीला महत्त्व द्या. (Photo : Freepik)
-
नियमित आरोग्य तपासणीची सवय लावा आणि तज्ज्ञांबरोबर आरोग्याबाबत चर्चा करा. रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची पातळी, रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक चाचण्या करा आणि त्यानुसार आरोग्याची काळजी घ्या. (Photo : Freepik)
-
रात्री सात ते नऊ तास चांगली झोप घ्या. झोपेचे वेळापत्रक बनवा आणि त्याचे अनुकरण करा. तणाव कमी करण्यासाठी चांगली झोप हा एक उत्तम पर्याय आहे. (Photo : Freepik)
-
अनेकदा आपण कामाच्या ओघात तासन् तास एकाच जागेवर बसतो. अशावेळी कामातून थोडा वेळ ब्रेक घेणे गरजेचे आहे. स्क्रीनपासून थोडा वेळ ब्रेक घेतल्याने मानसिक तणाव दूर होतो आणि ऊर्जा निर्माण होते. (Photo : Freepik)
-
मोबाइल, लॅपटॉपपासून स्वत:ला दूर करा आणि इतर आवडीच्या गोष्टींमध्ये स्वत:ला मग्न ठेवा. जर खूप जास्त तणाव वाढत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. समुपदेशकसुद्धा आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतात. (Photo : Freepik)

‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात…