-
अयोग्य जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आज, जगभरातील लोक मोठ्या संख्येने या आजाराने ग्रस्त आहेत.
-
इतकंच नाही तर कमी वायतील लोकांनासुद्धा या आजाराने विळखा घातला आहे. म्हणूनच सर्वच वयोगटातील लोकांनी मधुमेहापासून स्वतःचा बचाव करणे गरजेचे आहे.
-
मधुमेह हा क्रोनिक आजार असल्याने यामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. बदलत्या जीवनशैलीमुळे आज मोठ्या प्रमाणात लोक मधुमेहाला बळी पडत आहेत. तरुणांमध्येही हा आजार हळूहळू वाढत आहे.
-
ब्रिटनच्या डायबेटिक असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांमध्ये ४० वर्षाखालील लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण २३ टक्क्यांनी वाढले आहे.
-
ब्रिटनच नाही तर भारतातही ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. इथेही ३० ते ४० वयोगटातील लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
-
आज आपण जाणून घेऊया, कोणत्या वयात मधुमेहाचा धोका सर्वात जास्त असतो आणि तो टाळण्यासाठी काय करायला हवे.
-
एका अहवालानुसार, ४५ वर्षांनंतर टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
-
अमेरिकेतील १४% लोकांमध्ये या प्रकारचा मधुमेह आढळून आला आहे. या सर्वांचे वय ४५ ते ६४ वर्षे आहे.
-
ही संख्या १८ ते ४४ वयोगटातील लोकांपेक्षा जवळपास पाच पट जास्त आहे. जसजसे वय वाढते तसतसे मधुमेहाचा धोकाही वाढतो.
-
टाइप 2 मधुमेह ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये देखील आढळतो. अशा परिस्थितीत काय करावे जाणून घ्या.
-
आपली जीवनशैली सुधारावी. जास्त गोड किंवा जास्त खारट खाऊ नयेत. तेलकट पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे, हिरव्या भाज्या खाव्यात आणि जंक फूड, दारू आणि सिगारेट टाळावे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos: Freepik)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ‘रविवारी’ बँक सुरू ठेवण्याचे आदेश; मोठी घडामोड होणार…