-
प्रत्येकासाठी व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे, मग तो पुरुष असो किंवा स्त्री. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वेट ट्रेनिंग, कार्डिओ, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग, फंक्शन ट्रेनिंग केल्याने शारीरिक स्वास्थ्य तर मजबूत होतेच, पण मानसिक आरोग्यही चांगले राहते.(Photo: Freepik)
-
जर आपण महिलांबद्दल बोललो तर त्यांना ताकद प्रशिक्षण घेण्याचा सल्लादेखील दिला जातो. पण, किती दिवस व्यायाम करायचा आणि कोणता व्यायाम करायचा याबाबत अनेकवेळा त्यांच्या मनात संभ्रम असतो. चला तर मग जाणून घेऊया, याविषयी तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे. (Photo: Freepik)
-
तुम्हाला निरोगी व्हायचे आहे, वजन कमी करायचे आहे की वाढवायचे आहे हे सर्वप्रथम तुम्हाला ठरवायचे आहे. तुमच्या व्यायामाचे प्रकार यावरच अवलंबून असतील. (Photo: Freepik)
-
अमेरिकन हेल्थ डिपार्टमेंट दर आठवड्याला किमान १५० मिनिटे म्हणजे २ तास ३० मिनिटे व्यायाम किंवा कोणतीही शारीरिक क्रिया करण्याची शिफारस करते.(Photo: Freepik)
-
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आठवड्यातून तीन-चार दिवस व्यायाम करा. हे लवचिकतादेखील प्रदान करते आणि आपण वर्कआउटसाठी देखील तयार होतो.(Photo: Freepik)
-
बऱ्याच प्रकरणांमध्ये वजन कमी करण्यासाठी आपल्याला आहारातही बदल करावे लागतात. वजन कमी करण्यासाठी फक्त जिममध्ये जाऊन वेट ट्रेनिंग करणं गरजेचं नाही, तर शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणंही महत्त्वाचं आहे. (Photo: Freepik)
-
वजन कमी करण्याच्या बाबतीत तुम्हाला पाहिजे तेवढा व्यायाम करता येईल, पण त्याचबरोबर आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही चुकीचे पदार्थ खात असाल तर तुमच्या कॅलरीज बर्न होतात.(Photo: Freepik)
-
पण, जर तुम्ही कमी प्रमाणात आहार घेत असाल आणि वजन कमी करण्यासाठी जास्त वर्कआउट करत असाल तर त्यामुळे तुमची एनर्जी कमी होऊ शकते. (Photo: Freepik)
-
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, दर आठवड्याला १५० मिनिटांचा मध्यम तीव्रतेचा व्यायाम किंवा ७५ मिनिटांचा उच्च तीव्रतेचा व्यायाम केला पाहिजे. ज्यांना स्नायू बळकट करायचे आहेत आणि स्नायू वाढवायचे आहेत, त्यांनी आठवड्यातून ३० ते ६० मिनिटे तीन सत्रांत व्यायाम करावा.(Photo: Freepik)

१२ राशींच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? कोणाची चिडचिड कमी तर कोणाची कामे सुरळीत पार पडणार; वाचा राशिभविष्य