-
गाजरात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. गाजराचे फायदे भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. (फोटो : Freepik)
-
गाजरांमध्ये विशिष्ट प्रकारचे जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे डोळे, यकृत, किडनी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आतापर्यंत तुम्ही गाजराचे अने पदार्थ खाल्ले असतील आज आम्ही तुम्हाला गाजर दुधाची रेसिपी सांगणार आहोत.(फोटो : Freepik)
-
गाजर दूध तयार करण्यासाठी शिजवलेली गाजराची प्युरी लागते. ही प्युरी दुधात घालून त्यात वेलची आणि दालचिनी घातल्याने त्याची चव वाढते. चिरलेले बदाम आणि केशरने सजवून सर्व्ह करू शकता.(फोटो : Freepik)
-
ही एक हटके आणि मुलांना आवडेल अशी डिश आहे. चला तर पाहुयात याची सोपी रेसिपी. चला यासाठी २ गाजर (सोललेली), २ वाट्या दूध, दालचिनी, वेलची आणि साखर चवीनुसार, ४-५ बदाम, उकडून व चिरुन घ्या, केशराचे तुकडे असं साहित्य घ्या.(फोटो : Freepik)
-
आता रेसिपी पाहूयात. गाजर सोलून आणि कापून घ्या आणि प्रेशर कुकरमध्ये थोडे मऊ होईपर्यंत शिजवा.(फोटो : Freepik)
-
शिजवलेले गाजर आणि चिरलेले बदाम ब्लेंडरमध्ये थोडेसे पाणी घालून त्याची प्युरी तयार करा.(फोटो : Freepik)
-
आता एका पॅनमध्ये दूध गरम करा, त्यात लवंगा घाला. आता त्यात दालचिनी घालून उकळा.(फोटो : Freepik)
-
यानंतर उष्णता कमी करा आणि सुमारे ५ मिनिटे उकळू द्या. आता यात गाजर प्युरी घाला आणि ते मिक्स करा. ३-४ मिनिटे ढवळून घ्या. आता या मिश्रणात केशर आणि साखर घालून नीट मिसळून घ्या.(फोटो : Freepik)
-
तयार मिश्रण एका ग्लासमध्ये घाला. चिरलेले बदाम आणि केशरने सजवा आणि सर्व्ह करा.(फोटो : Freepik)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या