-
अनेकदा घरात भाजीपाला शिल्लक नसतो, अशावेळी कोणती भाजी करावी, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. तुमच्याबरोबर असं कधी झालं का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण ही बातमी वाचल्यानंतर पुढच्या वेळी तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही. (Photo : Freepik)
-
आज आपण एक अशी हटके रेसिपी जाणून घेणार आहोत, जी बनवायला सुद्धा खूप सोपी आहे आणि त्या रेसिपीसाठी कोणत्याही भाजीची आवश्यकता नाही. (Photo : Freepik)
-
फक्त चार कांद्यांपासून तुम्ही ही हटके रेसिपीचा आस्वाद घेऊ शकता.चार कांद्यापासून स्वादिष्ट भाजी कशी बनवायची, हे जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
-
साहित्य –
कांदे, तेल,जिरे, हळद, मीठ, लाल तिखट आणि कोथिंबीर (Photo : Freepik) -
सुरूवातीला चार कांदे घ्या.हे कांदे पातळ बारीक कापून घ्या. त्यानंतर गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तेल गरम करा.गरम तेलामध्ये जिरे टाका. (Photo : Freepik)
-
त्यानंतर पातळ बारीक चिरलेला कांदा त्यात टाका.कांदा सारखा परतून घ्या.दोन तीन मिनिटे परतून घ्या
त्यानंतर थोडे मीठ टाका. त्यामुळे कांदा चांगला शिजतो. (Photo : Freepik) -
त्यानंतर पुन्हा कांदा परतून घ्या आणि त्यानंतर ४-५ मिनिटे झाकण ठेवा. वाफ आल्यानंतर झाकण काढून घ्या. (Photo : Social Media)
-
त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट आणि जाडसर शेंगदाण्याचे कुट टाका. हे मसाले दोन तीन मिनिटे परतून घ्या. (Photo : Social Media)
-
शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.कांद्याची भाजी किंवा चटणी तयार होईल. (Photo : Social Media)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल