-
काही लोकांना मायग्रेन सुरू होण्यापूर्वी काही लक्षणे दिसू लागतात, ज्याला प्रोड्रोम म्हणतात. मायग्रेन सुरू होण्याच्या काही तास किंवा दोन दिवस आधी ही लक्षणे दिसू शकतात.
-
मायग्रेनने ग्रस्त असलेल्या ६०% लोकांना ही लक्षणे दिसतात. या लक्षणांमध्ये बद्धकोष्ठता किंवा अतिसार, मनःस्थिती बदलणे, मान आखडणे आणि काही खाद्यपदार्थ किंवा पेये घेण्याची लालसा यांचा समावेश असू शकतो.
-
मायग्रेनच्या आधी किंवा त्या दरम्यान, काही लोकांची दृष्टी आणि इतर संवेदनांमध्ये बदल होऊ शकतात. मायग्रेन असणाऱ्या सुमारे २०% लोकांना हा अनुभव येतो.
-
या लक्षणांमध्ये दृष्टी गमावणे, प्रखर प्रकाश किंवा स्पॉट्स दिसणे, आवाज किंवा संगीत ऐकू येणे, हाता-पायांमध्ये पिन आणि सुया टोचल्यासारखे जाणवणे यांचा समावेश होतो. अशा वेळेस काय करावे, जाणून घ्या.
-
कॅफिनचे सेवन करावे : काही लोकांसाठी, कॉफी, चहा किंवा कोला पिल्याने डोकेदुखी कमी होऊ शकते, परंतु त्याचे जास्त सेवन करू नये आणि झोपण्यापूर्वी कॅफीन घेणे टाळावे.
-
हीटिंग पॅड किंवा आइस पॅक वापरावे : तुमच्या डोक्यावर किंवा मानेवर बर्फ किंवा गरम पाण्याचा शेक दिल्याने वेदना कमी होऊ शकतात.
-
हायड्रेटेड राहावे : पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा आणि वेळोवेळी पाणी प्या.
-
जास्त औषध घेऊ नये : जास्त औषध घेणे देखील हानिकारक असू शकते. महिन्यातून दहा दिवसांपेक्षा जास्त काळ वेदनाशामक औषध घेऊ नका, यामुळे रीबाउंड डोकेदुखी होऊ शकते.
-
मायग्रेनला चालना देणारे पदार्थ टाळावे : जुने चीज, अल्कोहोल, प्रक्रिया केलेले मांस, चॉकलेट किंवा कृत्रिम गोड पदार्थ टाळा.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : फ्रीपिक)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL