-
दिवसभर काम करून, बराच वेळ जागं राहिल्यावर तुम्हाला सुद्धा खूप जांभई येते ना? (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, यादरम्यान तुमच्याही लक्षात एक गोष्ट नक्कीच आली असेल की, जेव्हा तुम्ही समोरच्याला जांभई देताना बघता तेव्हा तुम्हालाही जांभई येते. तर नक्की असं का होत असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर ही संसर्गजन्य जांभई ऑटोमॅटिक (स्वयंचलितपणे) जाणवते, पण, शास्त्रज्ञ म्हणतात की, ही पूर्णपणे स्वयंचलित प्रक्रिया नाही, कारण संसर्गजन्य जांभई फक्त चार किंवा पाच वयाच्या आसपास सुरू होते, जेव्हा मुलांमध्ये इतरांच्या समजून घेण्याची भावना विकसित होते. तेव्हा एखाद्याला जांभई देताना पाहून तुम्हालाही जांभई देण्याची इच्छा होऊ शकते. तर यालाच “संसर्गजन्य जांभई” असं म्हणतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जेव्हा तुम्ही पालकांना किंवा मित्र-मैत्रिणींना जांभई देताना पाहता तेव्हा तुम्हाला जास्त जांभई येते. कारण – संसर्गजन्य जांभईमध्ये सहानुभूती मोठी भूमिका बजावते. तुमच्या मेंदूला त्यांच्या भावना समजतात आणि तुम्हालाही जांभई येते ; असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
संसर्गजन्य जांभईमुळे सामाजिक संबंध मजबूत होण्यास मदत होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, आपला मेंदू आपल्याला इतरांशी कनेक्ट होण्यात मदत करतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
शास्त्रज्ञांना असेही आढळले की, माणसांसारखे पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे यांसारखे प्राणीसुद्धा जांभई देतात. खरं तर श्वान, चिंपांझी यांसारख्या काही प्राण्यांनाही संसर्गजन्य जांभई येते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, जांभईची ही क्षमता वृद्ध झाल्यावर कमी होऊ शकते आणि हे मानव आणि चिंपांझी दोघांमध्ये दिसून येते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुमच्या मेंदूमध्ये मिरर न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात. जेव्हा तुम्ही एखाद्याला काहीतरी करताना पाहता, तेव्हा हे न्यूरॉन्स सक्रिय होतात आणि ते तुम्हाला तेच करत असल्याचे जाणवतात. उदाहरणार्थ, जांभई. तुमचा मेंदू समोरची व्यक्ती काय करत आहे हे प्रतिबिंबित करत आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जांभई आपल्याला एकमेकांशी कनेक्ट होण्यास आणि समजून घेण्यास मदत करते, मग ती दुसऱ्या व्यक्तीशी असो किंवा प्राण्याशी.(फोटो सौजन्य: @Freepik)

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल