-
वाढत्या लठ्ठपणामुळे शरीरात अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. अनियमित जीवनशैली आणि अवेळी खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोक लठ्ठपणाचे बळी ठरत आहेत. अनेकदा लोकं वर्कआउटद्वारे वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यासाठी काही सोपे पर्याय देखील असतात ते जाणून घेऊया.
-
नियमितपणे धावल्याने शरीराच्या खालच्या भागाच्या स्नायूंवर परिणाम होतो आणि हे शरीराला मजबूत देखील करते.
-
वजन कमी करण्यासाठी धावणे हा खूप चांगला व्यायाम आहे. खरं तर, धावण्याने शरीरातील खूप कॅलरीज बर्न होतात.
-
नियमित धावण्याने हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
-
धावण्याने सोबतच जेव्हा आपण पायऱ्या चढतो तेव्हा सर्वात जास्त परिणाम आपल्या पायांवर, बोटे, गुडघे, आणि टाचांवर होतो, म्हणजे शरीराच्या सर्व खालच्या भागांवर होतो. ज्यामुळे या सर्व भागांचा व्यायाम होतो आणि शरीराचा खालचा भाग मजबूत होतो.
-
पायऱ्या चढल्याने कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. दररोज पायऱ्या चढणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
-
पायऱ्या चढल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका देखील कमी होतो.
-
नियमितपणे पायऱ्या चढल्याने फुफ्फुसे मजबूत होतात आणि त्यांची काम करण्याची क्षमता वाढते. पायऱ्या चढल्याने फुफ्फुसांनाही चांगला व्यायाम मिळतो. यासोबतच पायऱ्या चढल्याने मेंदूमध्ये हार्मोन्सचे इम्बॅलन्स होते ज्यामुळे मूड सुधारतो आणि तणाव कमी होतो.
-
हेव्ही वर्कआउटपेक्षा तुम्ही धावणे आणि पायऱ्या चढणे या सोप्या पर्यायांनी देखील वजन कमी होऊ शकतं. यासोबतच यामुळे अनेक आजरांचा धोका देखील कमी होतो. (फोटो: पेक्सेल्स)
दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग