-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत आहे त्याला या सर्व गोष्टी प्राप्त होतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरूच्या नक्षत्र परिवर्तनालाही खूप खास मानले जाते. गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव काही राशींच्या लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात पडतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी गुरू ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहे. गुरू रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून तो २०२५ पर्यंत याच नक्षत्रामध्ये असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
रोहिणी नक्षत्र हे २७ नक्षत्रांमध्ये चौथ्या क्रमांकाचे नक्षत्र असून त्याचा राशी स्वामी शुक्र आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू ग्रह या राशीच्या लग्न भावात असून याचा प्रभाव वृषभ राशीच्या व्यक्तींना सर्वाधिक पाहायला मिळेल. या काळात तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि भौतिक सुखाची प्राप्तीही होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा तुम्ही पूर्ण करून घ्याल. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींना गुरूचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ फळ देणारे असेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या सुख-समृद्धीत वाढ होईल. भौतिक सुखातही वाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम