-
शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर करण्यासाठी आहारात डाळींचा समावेश करण्याचा सल्ला अनेकदा आहारतज्ज्ञ नेहमी देतात. त्यामुळे शरीराला प्रोटिन्स मिळण्यासाठी डाळींचे आहारात सेवन उत्तम मानले जाते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
डाळींचा आहारात समावेश केल्यानं शरीराला पोषक घटक मिळतात इतकंच नाही तर डाळींनी परीपूर्ण पदार्थ खाल्ल्यास बराचवेळ भूक लागत नाही. पोट भरल्यासारखं वाटतं. त्यातच मुगाची डाळ ही सगळ्या डाळींमध्ये पचायला हलकी असते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तर तुम्ही आतापर्यंत मुगाच्या डाळीचे वडे, खिचडी असे अनेक घरामध्ये खाल्ले जातात. पण, आज आपण मुगाच्या डाळीचे पकोडे बनवणार आहोत. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीचे पकोडे कसे बनवायचे ते. (फोटो सौजन्य : लोकसत्ता डॉट कॉम)
-
मुगाच्या डाळीचे पकोडे बनवण्यासाठी मुगाची डाळ, मिरची, आल्याचा तुकडा, लसूणच्या पाकळ्या, मीठ, तेल इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
एक वाटी मुगाच्या डाळ दोन तास भिजत ठेवा.त्यानंतर मुगाची डाळ एका प्लेटमध्ये ठेवा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
मग मिक्सरच्या भांड्यात मिरची, आल्याचा तुकडा, लसूणच्या पाकळ्या, मीठ टाका. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
त्यानंतर मुगाची डाळ मिस्करच्या भांड्यात घाला आणि जाडसर मिक्स करून घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
नंतर कढईत तेल घ्या. मिश्रण चमच्याने किंवा हाताने तेलात सोडा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
गरमागरम मुगाच्या डाळीचे पकोडे तयार. (फोटो सौजन्य : लोकसत्ता डॉट कॉम)

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?