-
Kitchen Jugaad: पालक पनीर, मटार पनीर, पनीर पुलाव, पनीर टिक्का… एक ना दोन पनीरपासून असे कितीतरी पदार्थ पनीरपासून बनवतात येतात.
-
पनीरचा वापर काही वेळा थेट किंवा काही वेळा थोडे फ्राय करून केला जातो. पण तुम्ही कधी पनीरमध्ये टुथपेस्ट टाकून वापरून पाहिला आहे का? एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे.
-
आता तुम्ही म्हणाल पनीरमध्ये टथपेस्ट कोण टाकतं? चला जाणून घेऊयात तुम्हाला नक्की काय करायचंय…तुम्हाला करायचं काय आहे, तर कोणताही पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही पनीर आणला की त्याचा छोटासा तुकडा कापून बाजूला ठेवा. हा तुकडा किसणीवर किसून घ्या. आता यात एक चमचा गव्हाचं पीठ टाका. थोडासा लिंबूरस टाका. आता यात टुथपेस्ट टाका. चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण हातानी मिक्स करा.
-
आपल्या त्वचेची काळजी घेणं ही एक चांगली सवय आहे. मात्र बहुतांश महिला दिवसभरातील कामांमुळे स्वत:कडे दुर्लक्ष करतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण फार काही करत नाही.त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचेचे लाड करण्यासाठी, सलूनमध्ये जाणे यासाठी सहसा गृहिणी वेळ देत नाहीत.
-
मात्र काळजी करु नका आम्ही तुमच्या त्वचेसाठी घरघुती उपाय घेऊन आलो आहोत. गृहिणी दिवसभर घरच्या कामात व्यस्त असतात. त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. काम करून हात आणि पायांच्याही समस्या उद्भवतात.
-
गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात.
-
दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. @Didi_ye_kaise_kru यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

