-
हिरवी मिरची अनेकदा लवकर खराब होते. तसेच हिवाळ्यात फ्रिजमध्ये मिरची ठेवल्यानेही ती खराब होऊ लागते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अशा परिस्थितीत हिरवी मिरची रेफ्रिजरेटरशिवाय कशी साठवायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
या पद्धतीने तुम्ही मिरची दीर्घकाळ साठवून ठेवू शकता. विशेष म्हणजे ही पूर्वीपासून चालत आलेली एक पद्धत आहे, जी दीर्घकाळ काम करू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पूर्वीपासून हिरवी मिरची दीर्घकाळ साठविण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. हिरवी मिरची तेलात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
ती लवकर खराब होत नाही आणि ती तडका देण्यासाठीही वापरली जाऊ शकते. एवढेच नाही, तर तुम्ही ती थेट खाऊ शकता किंवा सॅलडमध्येही मिक्स करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सुरुवातीला मोहरीचे तेल गरम करा आणि नंतर ते थोडे थंड करून, काचेच्या बाटलीत भरून ठेवा.मग हिरवी मिरची धुऊन, कपड्याने पुसून पूर्णपणे कोरडी करा. आता मिरची मधोमध कापून मोहरीच्या तेलात ठेवा. त्यानंतर भरणीचे झाकण बंद करा. जेव्हा गरज असेल तेव्हा यातून हिरव्या मिरच्या काढून, त्या वापरू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुम्ही हिरवी मिरची व्हिनेगरमध्येही ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला हिरव्या मिरच्या कापून थेट व्हिनेगरच्या बाटलीत ठेवाव्या लागतील. काही काळ भरणी बंद ठेवा आणि गरज असेल तेव्हा वापरा. हिरवी मिरची व्हिनेगरमध्ये ठेवण्याचा एक फायदा म्हणजे तिची चव आणि त्यातील व्हिटॅमिन-सी आणखी वाढते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
हिरव्या मिरचीचा अतिरिक्त ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कागदाचा वापर करा आणि तो सुकू द्या. नंतर या हिरव्या मिरच्या छिद्रे असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा. त्यामुळे हवा खेळती राहून, मिरच्यांना खराब होण्यापासून प्रतिबंधित करील. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)

हार्ट अटॅक येणार असेल तर तोंडामध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे; अजिबात दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या