-
झोपेच्या वेळी आपण स्वतःची स्थिती कशी ठेवतो यावर आपल्या आरोग्यावर काय लक्षणीय परिणाम होणार ते अवलंबून असते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
बरेच लोक त्यांचे डोके थोडे वर करून झोपणे पसंत करतात. परंतु, या स्थितीमागील विज्ञान समजून घेतल्यास फायदे आणि संभाव्य तोटे दिसून येतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट व डॉ. गुड डीड क्लिनिकचे संचालक डॉ. चंद्रिल चुघ हे सांगतात, “जेव्हा झोपेत तुम्ही घराच्या छताकडे डोके करून झोपता तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे डोके आणि मानेच्या भागातील रक्तवाहिन्यांमधील दाब कमी होण्यास मदत होते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
परंतु, “उशी खूप उंच असल्यास, रक्तप्रवाह मर्यादित होऊ शकतो आणि त्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
कोशीस हॉस्पिटलचे सल्लागार फिजिशियन डॉ. पॅलेटी शिवा कार्तिक रेड्डी यांनी नमूद केले, “गुरुत्वाकर्षण येथे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कारण- डोके उंचावल्याने पोटातील अॅसिड अन्ननलिकेत परत येण्यापासून रोखले जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी छातीत जळजळ होणे आणि अस्वस्थता जाणवण्याचा धोका कमी होतो.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ चुघ म्हणतात, “जेव्हा डोके जमिनीपासून योग्य उंचीवर म्हणजे सामान्यत: १५-३० अंशांदरम्यान असते, तेव्हा ते मणक्याला तटस्थ राखण्यास मदत करू शकते,” (फोटो सौजन्य: Freepik)
-
झोपेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम विविध व्यक्तींच्या बाबतीत वेगवेगळा असतो. ही स्थिती विशेषत: ज्यांना श्वास घेण्यास त्रास होतो अशा व्यक्तींसाठी त्रासदायक असू शकते. डॉ रेड्डी सांगतात, “हवेचा प्रवाह सुधारून, ही स्थिती वारंवार जागृत होण्यापासून रोखली जाऊ शकते आणि व्यक्तीला गाढ झोप येण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
तज्ज्ञांच्या मते, झोपताना डोक्याखाली उशी घेणे विशेषतः फायदेशीर आहे. अॅसिड रिफ्लक्स किंवा जीईआरडी असलेल्यांसाठी उपयुक्त ठरेल.ज्यांना स्लीप अॅप्निया किंवा ज्यांना खूप घोरण्याची सवय आहे अशांसाठी साह्यकारी आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)

मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघत राहिले अन्…, रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल