-
रक्तातील साखरेची उच्च पातळी म्हणजे हायपरग्लायसेमिया ही चिंताजनक बाब असू शकते. मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. अनिकेत मुळे यांनी सांगितले की, रक्तातील साखरेची ही अचानक झालेली वाढ विविध कारणांमुळे संभवते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जसे की अति ताणतणाव, निर्जलीकरण, आहारातील निवडी, जास्त प्रमाणात साखर खाणे, कॅफिन पिणे, पुरेशी झोप न लागणे, शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय असणे किंवा डॉक्टरांनी सांगितलेली औषधे न घेणे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जेव्हा आम्हाला सोशल मीडियावर आहारतज्ज्ञ चारमेन हा डोमिंग्वेझ यांनी रक्तातील साखरेची पातळी एक तासाच्या आत नियंत्रित करण्यासाठी हॅक सुचविलेली रील भेटली, तेव्हा आम्ही पडताळणी करण्याचे ठरवले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
डोमिंग्वेझ यांच्या मते, एखादी व्यक्ती निम्न व्यायाम करून, एक तासाच्या आत रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
बिनसाखरेची ग्रीन टी प्या, २०-३० मिनिटे चाला, १५-२० मिनिटे पायऱ्या चढा, चार ग्लास पाणी प्या आणि आल्याचा चहा प्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ. मुळे म्हणाले की, रक्तात साखरेची अत्यंत उच्च पातळी असणे जीवघेणी बाब ठरू शकते, “संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी ती तत्काळ कमी करण्याची गरज आहे. एखादी व्यक्ती त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी किंवा योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी विविध हॅक किंवा तंत्रे वापरून पाहू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ. अरोरा यांनी पुढे सांगितले की, रक्तातील साखर कमी करण्याच्या इतर प्रभावी पद्धतींमध्ये भरपूर पाणी, दालचिनीचे पाणी, ग्रीन टी किंवा थोड्या प्रमाणात (एक चमचा) अॅपल सायडर व्हिनेगर पिणे यांचा समावेश होतो. “त्याशिवाय श्वासोच्छवासाचा व्यायाम – जसे की पर्यायी नाकपुडी किंवा डायफ्रामॅटिक श्वासोच्छ्वास (१० ते १५ मिनिटे) रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासदेखील मदत करू शकतो.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुमच्या रक्तातील साखरेची पातळी त्या विशिष्ट पातळीपर्यंत वाढल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. “तुमच्या रक्तातील साखरेची पातळी योग्य त्या प्रमाणात राखण्यासाठी तुमचे डॉक्टर शुगर-फास्ट-ॲक्टिंग इन्सुलिन वापरू शकतात. डॉक्टरांची भेट टाळल्यास किंवा उशीर केल्याने तुमची प्रकृती बिघडू शकते आणि आरोग्याच्या विविध गुंतागुंती होण्याचा धोका वाढतो,” असे डॉ. मुळे यांनी सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
टाईप-१ चा मधुमेह असलेल्या व्यक्तींनी कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. “हायपोग्लायसेमिया टाळण्यासाठी टाईप १ मधुमेहासाठी व्यायामाची वेळ महत्त्वाची आहे, विशेषत: जर अलीकडेच इन्सुलिन दिले गेले असेल. (फोटो सौजन्य: Freepik)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल