य
-
ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मंगळ २२ महिने एका राशीत राहतो आणि त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींवर मंगळाची कृपा होईल. ज्याच्या प्रभावाने या व्यक्तींचा साहस, पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींनादेखील मंगळाच्या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. या काळात तुमच्या सुख-सुविधा आणि भौतिक सुखामध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मंगळ वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह असल्याने हे राशी परिवर्तन वृश्चिक राशीसाठी शुभ फळ देणारे असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. आरोग्य उत्तम राहिल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
