-
जावेद हबीब हे हेअर केअर उद्योगातील एक प्रसिद्ध नाव आहे, ज्यांना काही दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्याबरोबरचा पोर्टफोलिओ सादर केला आहे. गॅलाटा इंडियाला दिलेल्या अलीकडील मुलाखतीत जावेद हबीब यांनी त्यांच्या सेलिब्रिटी क्लायंट्बसरोबर काम करतानाची काही गुपिते सांगितली आहेत. (Photo: Jawed Habib/instagram)
-
ओल्या केसांना तेल लावणे खूप महत्वाचे आहे यावर भर देऊन, हेअरस्टायलिस्टने सांगितले की डोक्याचे केस ओले करण्यासाठी कोमट पाणी वापरावे – पाणी खूप गरम किंवा खूप थंड नसावे. एकदा ते ओले झाले की, केसांना तेल लावा. (Photo: Freepik)
-
त्यांच्या मते, तुमच्या केसांसाठी सर्वोत्तम तेल म्हणजे मोहरीचे तेल. केसांना तेल लावल्यानंतर, केसांना विंचरा किंवा ब्रश करा. पाच मिनिटे थांबा आणि नंतर तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही शाम्पूने केस धुवा. (Photo: Freepik)
-
त्यांनी सर्वात महागडा किंवा ट्रेंडी शाम्पू निवडण्याचा सल्ला दिला नाही, तर तुमच्या केसांना आणि टाळूच्या प्रकारानुसार योग्य असा शाम्पू निवडा जो कोरडेपणा कमी करेल आणि ओलावा वाढवेल असं सांगितलं. (Photo: Freepik)
-
“कांद्याचा रस काढून केसांना तेलाने मसाज केल्याप्रमाणे मसाज करा. आठवड्यातून २ वेळा हे करा, आणि तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील,” असंही त्यांनी सांगितलं. (Photo: Freepik)
-
तुमच्या केसांचे आरोग्य राखण्यासाठी दर आठ ते दहा आठवड्यांनी केसांचे ट्रिमिंग करण्याची शिफारस त्यांनी केली. (Photo: Freepik)

Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल