-
रात्री झोपण्यापूर्वी किंवा ऑफिसवरून संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना आंघोळ करण्याची सवय असते. खरे तर दिवसभर ऑफिस, प्रवास यांमुळे शरीराला घाम येतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अशा परिस्थितीत अंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते. त्यामुळे अनेक जण रात्री अंघोळ करणे त्यांच्या दिनचर्येत समाविष्ट करतात. रात्री अंघोळ करण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने ताप आणि थकवा दूर होतो. त्यामुळे मन शांत होते, ज्यामुळे चांगली झोप येते आणि निद्रानाशाची समस्यादेखील दूर होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी एक ते दोन तास आधी अंघोळ केल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
रात्री अंघोळ केल्याने त्वचा स्वच्छ होते. खरे तर दिवसभर धूळ आणि घाम यांमुळे त्वचेवर घाण साचते, ज्यामुळे कधी कधी मुरमे आणि डागांची समस्या उद्भवते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अशा परिस्थितीत रात्री अंघोळ केल्याने संक्रमण, अॅलर्जीची समस्या उद्भवत नाही.(फोटो सौजन्य: Freepik)
-
रात्री अंघोळ केल्याने मानसिक शांती मिळते. त्यामुळे दिवसभरातील ताण कमी होतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला आराम मिळून मन शांत होते आणि त्चांगली झोप येण्यासही मदत होते.(फोटो सौजन्य: Freepik) -
रात्रीच्या अंघोळीइतकीच सकाळची अंघोळही खूप महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर आहे. त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो. कामात उत्साह आणि सकारात्मकता राहते. तसेच रात्रीच्या झोपेमुळे आलेला आळसही दूर होतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)

US H 1B Visa News: ‘रविवारच्या आधी अमेरिकेत परत या’, ट्रम्प यांच्या निर्णयामुळं Microsoft, Amazon कंपन्यांची धावाधाव; कर्मचाऱ्यांना दिला इशारा