-
ज्याप्रमाणे व्यक्तीच्या स्वभावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अंदाज राशीवरून लावता येतो, त्याचप्रमाणे संख्याशास्त्रातही संख्यांना खूप महत्त्व आहे. (Photo-freepik)
-
असे मानले जाते की, प्रत्येक संख्या कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. आपली जन्मतारीख केवळ एक आकडा नसतो, तर ती आपल्या आयुष्याची दिशा आणि नशीब ठरवते, असं अंकज्योतिषशास्त्र सांगतं. (Photo-freepik)
-
मूलांक एक अंक असतो. व्यक्तीच्या जन्मतारखेतून मिळणारा अंक, त्या व्यक्तीच्या संदर्भातील अनेक गोष्टींचा खुलासा करतो. एकंदरीत, हा अंक त्या व्यक्तीच्या जीवनाच्या संबंधित असतो. (Photo-freepik)
-
१ ते ९ या अंकांचे संबंधित ग्रह आणि देव असतात आणि काही निवडक अंक असणाऱ्या व्यक्तींवर भगवान शंकराची विशेष कृपा सदैव राहते. (Photo-freepik)
-
अशा लोकांचे जीवन राजासारखे होते आणि त्यांच्या प्रत्येक इच्छा भोलेनाथ पूर्ण करतात. चला जाणून घेऊया, कोणत्या जन्मतारखांच्या लोकांवर शिवशंकर कायम मेहरबान राहतात. (Photo-Pixabay)
-
अंकशास्त्रानुसार, जे लोक महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेले असतात, त्यांचा मूलांक ७ असतो. या मूलांकाचा संबंध केतू ग्रहाशी असून हे लोक प्रामुख्याने शांत, आध्यात्मिक असतात. यांच्यात भगवान शिवविषयी ओढ असते. (Photo-Pixabay)
-
भोलेनाथाची भक्ती केल्याने त्यांना मानसिक शांती, आर्थिक समृद्धी आणि अध्यात्मिक प्रगतीचा आशीर्वाद मिळतो. अनेकदा संकटे त्यांच्यापर्यंत पोहोचतही नाहीत, असंही म्हणतात. (Photo-Pixabay)
-
ज्यांचा जन्म ५, १४ किंवा २३ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ५ असतो. हा अंक बुध ग्रहाशी निगडित असून हे लोक बुद्धिमान, बोलण्यात कुशल, स्वभावाने नम्र असतात. आणि इतरांना मदत करण्यातही नेहमी पुढे येत असतात. (Photo-Pixabay)
-
हे लोक भोलेनाथाची भक्ती मनापासून करतात, त्यामुळे त्यांना करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात मोठे यश मिळते. त्यांचं यश हे फक्त मेहनतीचं नव्हे, तर शिवकृपेचं फळ असतं. (Photo-Pixabay)
-
९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ९ असतो. हा अंक मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. हे लोक अत्यंत धाडसी, मेहनती आणि जिद्दी असतात. शिवशंकरांवरील श्रद्धेमुळे ते संकटातही डगमगत नाहीत. (Photo-Pixabay)
-
त्यांच्या कठीण काळातही भोलेनाथ त्यांच्यासोबत असतात, त्यामुळे त्यांना समाजात मान-सन्मान, यश आणि प्रतिष्ठा मिळते. (Photo-Pixabay)
-
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.) (Photo-Pixabay)

VIDEO:”विठ्ठल कोणत्याही रुपात येऊ शकतो” बायकोला दागीना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण दुकानदाराने जे केलं त्यानं मन जिंकलं