-
भारतीय संस्कृतीत मंत्र, पूजा आणि ध्यानाला पवित्र स्थान आहे. मात्र, अलीकडे फॅशनच्या नावाखाली मंत्र असलेले कपडे घालण्याची चटक वाढली आहे; ज्यावर गायत्री मंत्र, शिव मंत्र, वासुदेव मंत्र छापलेले असतात. श्रद्धा आणि स्टाइलचा हा मिलाफ, वास्तवात अपमान तर ठरत नाही ना? (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
-
काहींना हे भक्तीची अभिव्यक्ती वाटते, तर काहींसाठी ही आध्यात्मिक फॅशन! पण शास्त्रांच्या प्रकाशात पाहिल्यास, पवित्र मंत्रांचे वस्त्रांवर छपाई करणे योग्य आहे का? हा फक्त स्टाइलचा भाग की परंपरेचा अपमान? (छायाचित्र स्रोत: अनस्प्लॅश)
-
वृंदावनचे संत श्री प्रेमानंद गोविंद शरण महाराज यांनी मंत्र असलेल्या कपड्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भक्तीचा सन्मान राखायचा की अज्ञानात मार्ग भटकायचा? याचे उत्तर शोधण्यासाठी भाविक थेट त्यांच्या आश्रमात धाव घेत आहेत. (फोटो स्रोत: प्रेमानंदजी महाराज/फेसबुक)
-
एका भक्ताने शिवमंत्र छापलेले कपडे घालून आश्रमात येताच, प्रेमानंद महाराजांनी तात्काळ चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “पवित्र मंत्र अंगावर घालणे योग्य नाही!” (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
-
प्रेमानंदजी महाराजांनी सांगितले, “कृपया मंत्र लिहिलेले कपडे घालू नका, हे एक चुकीचं ट्रेंड बनलं आहे – पवित्र मंत्रांचे असं अवमूल्यन योग्य नाही.” (छायाचित्र स्रोत: प्रेमानंदजी महाराज/फेसबुक)
-
प्रेमानंदजी महाराज म्हणाले, “मंत्र कपड्यांवर नाही, हृदयात असावेत. ते साधनेसाठी आहेत, दिखाव्यासाठी नाही.” (छायाचित्र स्रोत: अनस्प्लॅश)
-
प्रेमानंदजी महाराज म्हणाले, “मंत्र ही एक पवित्र साधना आहे. तो गुरुंकडून दीक्षा घेतल्यानंतरच हळू आवाजात किंवा मनातच जपायला हवा, तो मोठ्याने बोलायचा नसतो.” (छायाचित्र स्रोत: प्रेमानंदजी महाराज/फेसबुक)
-
महाराजजी म्हणाले, “आजकाल कीर्तनात मंत्रांचा वापर फॅशनसारखा होतोय, पण हे शास्त्रसम्मत नाही. हे धर्माच्या मूळ तत्वांशी विसंगत आहे.” (छायाचित्र स्रोत: प्रेमानंदजी महाराज/फेसबुक)
-
ते म्हणाले, “शिव मंत्र, गायत्री मंत्र यांसारखे पंचाक्षरी व आद्यक्षरी मंत्र मानसिक जपासाठीच आहेत. त्यांचा सार्वजनिक जप करणे योग्य नाही आणि तो अशुभ ठरू शकतो.” (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
-
प्रेमानंदजी म्हणाले, “कलियुगात लोक सार्वजनिक ठिकाणी मंत्र जपत आहेत, पण हे मनाला भ्रष्ट करणारे आणि अशुभ आहे. त्यांना वाटते ते पुण्यकार्य आहे, पण प्रत्यक्षात ते योग्य नाही.” (छायाचित्र स्रोत: रेडिट)
-
मंत्रांचा अपमान करू नका. कपड्यांवर लिहिलेल्या मंत्रांमुळे ते कुठेही नेले जातात, जसे की शौचालय, बाजार इत्यादी. हा पवित्र मंत्रांचा अनादर आहे. (छायाचित्र स्रोत: प्रेमानंदजी महाराज/फेसबुक)
-
प्रेमानंदजी महाराज म्हणाले, “मंत्र लिहिलेले कपडे घालण्याऐवजी, ते यमुनामातेत विसर्जित करा. यानेच त्यांचा आदर आणि पावित्र्य टिकेल.” (छायाचित्र स्रोत: प्रेमानंदजी महाराज/फेसबुक)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक