-
पावसाळ्यात मध्य प्रदेशचं सौंदर्य खुलून ???उठतं! (की- येतं.)??? ‘भारताच्या हृदयात’ असलेली ही ५ रोमँटिक ठिकाणं निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासमान आहेत. त्यामुळे हिरवळीनं नटलेले डोंगर, धबधबे आणि सांस्कृतिक वारसा यांचा अनुभव या पावसाळ्यात आवर्जून घ्या. (छायाचित्र: मध्य प्रदेश पर्यटन)
-
पंचमढी
मध्य प्रदेशातील हे सुंदर हिल स्टेशन निसर्गप्रेमींसाठी खास आहे. तेथील घनदाट जंगल, कोसळणाऱ्या धबधब्यांचा आल्हाददायी आवाज आणि पक्ष्यांची गूज या गोष्टी सहजगत्या मनाला भुरळ घालतात. बी फॉल्स, अप्सरा फॉल्स, रजत जलप्रपात आणि प्राचीन लेणी यांची सफर म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. (छायाचित्र: मध्य प्रदेश पर्यटन) -
मांडू
धार जिल्ह्यातील मांडू हे ठिकाण पावसाळ्यात स्वर्गासारखं भासतं. ऐतिहासिक वास्तू, धुक्यात हरवलेले किल्ले, झरे व थंडी यामुळे मांडूचा अनुभव मनात घर करून राहतो. (छायाचित्र: मध्य प्रदेश पर्यटन) -
भेडाघाट
जबलपूरजवळ वसलेलं भेडाघाट धबधबे, संगमरवरी दऱ्या यांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यातील वाढलेला जलप्रवाह आणि धुक्याची नजाकत यांमुळे हे दृश्य अगदी मंत्रमुग्ध करणारं ठरतं. (छायाचित्र: मध्य प्रदेश पर्यटन) -
अमरकंटक
हिरवळ, धबधबे व धुक्यात न्हालेलं हे शांत तीर्थस्थान पावसाळ्यात खासच भासतं. निसर्गसौंदर्य आणि आध्यात्मिकतेचा संगम अनुभवण्यासाठी अमरकंटक ही सर्वोत्तम जागा आहे. (छायाचित्र: मध्य प्रदेश पर्यटन) -
खजुराहो
युनेस्को विश्ववारसा स्थळ असलेलं खजुराहो हे प्राचीन मंदिरांच्या अप्रतिम कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. हिरवळ, बागा व इतिहासाचा श्वास घेणारं हे ठिकाण प्रत्येक इतिहासप्रेमीनं एकदा तरी जरूर पाहावं. (छायाचित्र: मध्य प्रदेश पर्यटन)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक