-
ज्योतिष शास्त्रानुसार जुलै महिना खूप खास आहे, या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. राशी गोचरसह ग्रहांची युती होणार आहे ज्यामुळे विविध प्रकारचे शुभ आणि अशुभ योगाचा निर्माण होत आहे.
-
जुलै महिना काही राशींसाठी सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात गुरु, शनी, मंगळ, बुध आणि सूर्य या प्रमुख ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल होणार आहेत.
-
या ग्रहांच्या चालीनुसार १२ पैकी ५ राशींच्या लोकांना जुलैमध्ये प्रगतीचे, आर्थिक लाभाचे आणि वैयक्तिक सुखाचे शुभ संकेत मिळणार आहेत. कोणत्या भाग्यशाली राशींना आयुष्यात सकारात्मक परिवर्तन अनुभवायला मिळेल, चला जाणून घेऊया…
-
वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना अत्यंत शुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. या राशीच्या मंडळींना व्यवसायात यश मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारु शकेल. कार्यालयीन कामांमधील अडथळे दूर होऊ शकतात.
-
मिथुन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना लाभदायी ठरु शकतो. लोकांना करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. प्रवास लाभदायक ठरु शकतात. नोकरीत पदोन्नतीसह उत्पन्न वाढू शकतो. प्रेमसंबंधात सुधारणा दिसून येईल.
-
कन्या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना विशेष फलदायी ठरु शकतो. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. धर्मकार्यात सहभाग वाढेल. शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना उत्तम परिणाम मिळू शकतात.
-
तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन साधन मिळून व्यवसायात लाभ होऊ शकतो. अडकलेला पैसा या काळात परत मिळू शकतो. वैवाहिक जीवनात सुख वाढू शकतो. बँक बॅलन्स वाढू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकतो.
-
कुंभ राशीच्या लोकांनी आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. वरिष्ठांचा सहकार्य लाभू शकतो. व्यावसायिकांनाही नफा मिळू शकेल. मनासारखे काम या काळात पूर्ण होऊ शकतात.
-
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.) (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

Asia Cup Trophy: मोठी बातमी! भारतीय संघाचा आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार; मोहसीन नक्वींना बगल