-
मन-शरीराचं संतुलन हवंय? मग ‘भ्रामरी प्राणायाम’ जरूर करा!
मन शांत आणि शरीर ताजं ठेवायचं असेल तर भ्रामरी प्राणायाम खूप उपयुक्त आहे. ‘भ्रामरी’ म्हणजे मधमाशी. श्वास सोडताना जो मधमाशीसारखा आवाज येतो, त्यावरूनच याचं नाव पडलं आहे. हा आवाज आणि त्यातून होणारं सौम्य कंपन शरीराला खूप आराम देतं. -
तणाव, राग आणि अस्वस्थता? उत्तर आहे भ्रामरी!
भ्रामरी प्राणायाम केल्याने मन स्थिर राहतं, तणाव कमी होतो आणि रागावर नियंत्रण मिळतं. रोज काही मिनिटं केले तरी अस्वस्थ मन शांत होतं. नसा सैलावतात आणि विचारशक्ती सुधारते. हे प्राणायाम म्हणजे मानसिक शांततेचा नैसर्गिक उपाय. -
मायग्रेनपासून नैसर्गिक आराम हवाय?
डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होत असेल तर भ्रामरी प्राणायाम खूप फायदेशीर ठरतो. श्वास सोडताना होणाऱ्या मधमाशीच्या आवाजामुळे मेंदू शांत होतो. हा रोजचा सराव डोकेदुखीच्या वेदना हळूहळू कमी करतो. -
भ्रामरी प्राणायाम कसे करायचे? अगदी सोप्पं!
शांत जागेत बसा, डोळे बंद करा, दोन्ही कान बोटांनी झाका, आता नाकाने श्वास घ्या आणि श्वास सोडताना मधमाशीसारखा ‘हूँऽऽ’ असा सौम्य आवाज करा. डोक्यात थोडं कंपन जाणवेल आणि मन शांत होईल. रोज ५-१० मिनिटांचा सराव फायदेशीर ठरतो. -
एकाग्रतेत वाढ, मनात शांतता हे सगळं एका सरावात!
भ्रामरी प्राणायाम हे फक्त श्वसनाचं तंत्र नाही, तर हे तुमच्या मनासाठी एक ध्यानधारणा आहे. यामुळे मनाचा गोंधळ थांबतो, विचार स्पष्ट होतात आणि एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांसाठी, कामाच्या तणावात असणाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी उपयुक्त असे हे योगासन आहे.

Shefali Jariwala Death : पोलिसांनी नोंदवला शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीचा जबाब