-
पोषणसंपन्नता : शेवग्याच्या पानांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक जीवनसत्त्वे (Vitamin A, B, C) मुबलक प्रमाणात असतात. विशेषतः वनस्पतीजन्य प्रथिनांचे हे एक उत्कृष्ट स्रोत आहे, त्यामुळे शाकाहारी व्यक्तींसाठी हे पान अमूल्य ठरते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
-
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते : या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, ताप, संक्रमण यापासून संरक्षण मिळते. नियमित सेवन केल्यास व्हायरल आजारांपासून बचाव होतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
-
रक्तातील साखर नियंत्रित करते : शेवग्याच्या पानांमध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म आढळतात. हे पान मधुमेहींसाठी विशेष फायदेशीर आहे. ते शरीरातील इन्सुलिनची क्रिया नियंत्रित करून रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. (छायाचित्र स्रोत: Freepik)
-
हाडे मजबूत करतो : या पानांमध्ये असलेले भरपूर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते. महिलांमध्ये विशेषतः रजोनिवृत्तीनंतर होणारी हाडांची झीज टाळण्यासाठी शेवग्याची पाने उपयुक्त ठरतात. (छायाचित्र स्रोत: Freepik)
-
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर : शेवग्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व A, C भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचेला नैसर्गिक तेज येते. यामुळे केस गळती, टक्कल आणि त्वचाविकारांवरही नियंत्रण ठेवता येते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
-
पचनसंस्था सुधारते : या पानांचा नियमित आहारात समावेश केल्यास पचनक्रिया सुधारते. अन्न चांगले पचते आणि बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो. यातील फायबर्स पोट साफ ठेवण्यास मदत करतात. (छायाचित्र स्रोत: Freepik)
-
वजन कमी करण्यात मदत : या पानांमध्ये कमी कॅलरी असूनदेखील भरपूर पोषणमूल्य असते, त्यामुळे वजन कमी करत असताना हे पान खाणे उपयुक्त ठरते. ते शरीरातील फॅट मेटाबोलिझम सुधारते आणि भूक नियंत्रित करते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
-
ॲनिमियावर प्रभावी उपाय : शेवग्याच्या पानांमध्ये आयर्नचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. ज्यांना वारंवार थकवा येतो, अशक्तपणा जाणवतो, त्यांच्यासाठी हे पान नैसर्गिक टॉनिकसारखे कार्य करते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
-
नैसर्गिक डीटॉक्सिफायर : शेवग्याच्या पानांमध्ये यकृताचे कार्य सुधारणारे घटक असतात. हे पान शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करते. नैसर्गिकरित्या शरीर शुद्ध ठेवण्यास हे मदत करते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

Shefali Jariwala Death : पोलिसांनी नोंदवला शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीचा जबाब