-
त्वचेची काळजी ही रोजची सवय ठेवा
पावसाळा आला की त्वचेसाठी थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. पण, ह्या छोट्या टिप्स तुम्हाला सुंदर, स्वच्छ आणि निरोगी त्वचा मिळवायला नक्की मदत करतील. -
स्वच्छ त्वचेसाठी रोजचे क्लिन्झिंग
पावसाळ्यात दमट हवामानामुळे त्वचेवर बॅक्टेरिया आणि बुरशी वाढतात, त्यामुळे चेहरा दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने धुणे आवश्यक आहे. तेलकट त्वचेसाठी ऑइल-कंट्रोल फेसवॉश वापरा आणि लक्षात ठेवा, मेकअप काढल्याशिवाय झोपू नका! -
मॉइश्चरायझर लावायला विसरू नका
ओलसर हवामान असले तरी त्वचेला मॉइश्चरायझरची गरज असते. जेल-बेस्ड किंवा नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर वापरा. तेलकट त्वचेसाठी ऑइल-फ्री पर्याय उत्तम ठरतो. -
ढगाळ हवामानातही सनस्क्रीन आवश्यक
पावसाळ्यातही सूर्याच्या किरणांपासून त्वचेला धोका असतो. घरात असाल तरी SPF 30 असलेले सनस्क्रीन लावा. बाहेर जात असाल तर वॉटरप्रूफ सनस्क्रीन वापरणे फायदेशीर ठरेल. -
स्क्रबने एक्सफोलिएट करा
मृत त्वचा हटवण्यासाठी आठवड्यातून एकदा सौम्य स्क्रब वापरा. घरच्या घरी बनवलेले दही-बेसन किंवा ओट्स-मधाचे स्क्रब नैसर्गिक आणि त्वचेसाठी सुरक्षित आहेत. जास्त स्क्रब केल्याने त्वचा नाजूक होऊ शकते. -
त्वचेसाठी पोषक आहार घ्या
निरोगी त्वचेसाठी ताज्या फळभाज्या, अँटिऑक्सिडंट्स आणि भरपूर पाणी आवश्यक आहे. झणझणीत, तेलकट पदार्थ टाळा. आतून आरोग्य चांगले असेल तर त्वचा आपोआपच चमकेल. -
बुरशीजन्य संसर्गापासून बचाव करा
पावसाळ्यात शरीर ओलसर राहिल्यास बुरशीचा त्रास होऊ शकतो. अंघोळीनंतर त्वचा नीट कोरडी करा, विशेषतः पायाची बोटं, अंडरआर्म्स आणि घड्या. हलके, सैल आणि कॉटनचे कपडे घाला. गरज असल्यास अँटी-फंगल पावडर वापरा.

भारतात सापडली हडप्पाहून प्राचीन, ९००० हजार वर्षे जुनी संस्कृती जगाचा इतिहास बदलणार का?