-
सतत डोक्याला खाज येतेय? पांढरे कण खांद्यावर पडतायत? अशी लक्षणं अनेकांना अनुभवायला मिळतात. मात्र, त्यामागे नेमकं कारण काय हे समजत नाही. काही वेळा ही लक्षणं कोंड्यामुळे (Dandruff) तर काही वेळा डोक्याच्या त्वचेतील कोरडेपणामुळे (Dry Scalp) निर्माण होतात. या दोन्ही समस्यांची कारणं, लक्षणं आणि उपचार वेगवेगळे असतात. वाचा या दोघांमधील मुख्य फरक आणि जाणून घ्या कोणता उपाय तुमच्यासाठी योग्य ठरेल… (फोटो सौजन्य : FreePik)
-
डॅन्ड्रफ म्हणजे काय? डॅन्ड्रफ ही डोक्याच्या त्वचेतील एक सामान्य समस्या असून ती प्रामुख्याने मालासेझिया नावाच्या फंगल इन्फेक्शनमुळे होते. या वेळी त्वचेवरून पांढऱ्या किंवा थोड्याशा पिवळसर साली सुटतात. डोकं जास्त तेलकट असलं, तर डॅन्ड्रफ वाढतो. (फोटो सौजन्य : FreePik)
-
ड्राय स्कॅल्प म्हणजे काय? ड्राय स्कॅल्प म्हणजे डोक्याची त्वचा खूप कोरडी होणे. यामध्ये तेलाचे प्रमाण फारच कमी असते, त्यामुळे त्वचा घट्ट, टाईट वाटते आणि किरकिरी होते. थंडी, हार्श शॅम्पू किंवा गरम पाणी हे सामान्य कारणं असतात. (फोटो सौजन्य : FreePik)
-
लक्षणांतील फरक ओळखा डॅन्ड्रफमध्ये कण मोठे आणि ओलेसर असतात, तर ड्राय स्कॅल्पमध्ये कण सूक्ष्म आणि कोरडे दिसतात. डॅन्ड्रफ असल्यास डोकं थोडं तेलकट वाटतं, तर ड्राय स्कॅल्पमध्ये डोकं घट्ट आणि कोरडं वाटतं. (फोटो सौजन्य : FreePik)
-
दोघांमागील कारणं काय? डॅन्ड्रफचे मुख्य कारण बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection) असते, तर ड्राय स्कॅल्पमागे हवामान, पाण्याचा प्रकार, शॅम्पूतील केमिकल्स आणि आहार असू शकतो. (फोटो सौजन्य : FreePik)
-
उपचार वेगळे का असतात? डॅन्ड्रफवर बुरशीविरोधी (Antifungal) शॅम्पू – जसे की, झिंक प्यायथिऑन, केटोकोनाझोल वापरणं आवश्यक असतं; तर ड्राय स्कॅल्पसाठी केसांना ओलावा देणारे नैसर्गिक उपाय – जसे की नारळ तेल, अॅलोव्हेरा फायदेशीर ठरतात. (फोटो सौजन्य : FreePik)
-
डॉक्टरांची काय शिफारस आहे? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की, नेहमी केवळ कोंड्यावर लक्ष केंद्रित न करता त्यामागचं मूळ कारण शोधणं महत्त्वाचं आहे. चुकीचा उपचार केल्यास त्रास वाढू शकतो. (फोटो सौजन्य : FreePik)
-
घरी करता येतील असे उपाय डॅन्ड्रफसाठी : अँटी-डॅन्ड्रफ शॅम्पू आठवड्यातून २-३ वेळा वापरा. ड्राय स्कॅल्पसाठी : कोमट तेलाने मसाज करा, सौम्य शॅम्पू वापरा आणि गरम पाणी टाळा. (फोटो सौजन्य : FreePik)
-
तज्ज्ञांचे मत : उपचाराआधी निदान आवश्यक “कोरडे कण दिसले म्हणजे लगेच अँटी-डॅन्ड्रफ शॅम्पू वापरू नका, आधी कारण स्पष्ट करा. गरज असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या,” असं तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं. (फोटो सौजन्य : FreePik)
-
थोडक्यात फरक ओळखा, उपाय निवडा कोंडा आणि ड्राय स्कॅल्प दिसायला सारखे वाटले तरी त्यांचं मूळ कारण वेगळं असतं, त्यामुळे उपचार करताना ‘एकच उपाय सगळ्यांसाठी’ ही पद्धत चुकू शकते. आपल्या त्वचेनुसार योग्य उपाय निवडणं आवश्यक आहे. सूचना : तुमच्या डोक्याच्या त्वचेला खरी गरज काय आहे हे ओळखा आणि उपचारात बदल करा, कारण निरोगी केसांची सुरुवात आरोग्यदायी स्कॅल्पपासूनच होते. (फोटो सौजन्य : FreePik)

Vadodara Bridge Collapse : गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला, अनेक वाहनं नदीत पडली, ९ जणांचा मृत्यू