-
जेवणाची चव आणि पचन दोन्ही सुधरवणारी बडीशेप
बडीशेप केवळ चवदार मसाला नाही, तर आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. आयुर्वेदात शतकानुशतकांपासून पचनासाठी तिचा उपयोग होतो. जेवणानंतर थोडीशी बडीशेप चावल्यास चवही वाढते आणि अनेक आरोग्य फायदेही मिळतात. -
श्वास ताजातवाना आणि पचन सुधारते
बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात. ती जेवणानंतर खाल्ल्याने श्वास ताजा राहतो, पचनक्रिया सुधारते, पोटफुगी कमी होते आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते. -
पचन समस्या कमी करते
बडीशेपचे अँटी-स्पास्मोडिक गुण आतड्यांच्या स्नायूंना आराम देतात. त्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात. यातील नैसर्गिक संयुगे पाचक एंजाइम्स सक्रिय करतात, जे पचन जलद करतात आणि पोषणशक्ती वाढवतात. -
हार्मोनल संतुलन राखते
बडीशेपमध्ये फायटोएस्ट्रोजेन्स असतात, जे स्त्रियांच्या हार्मोनल असंतुलनावर उपयोगी ठरतात. मासिक पाळीतील त्रास, मूड स्विंग्स आणि पोटफुगी यावर याचा सकारात्मक परिणाम होतो. -
वजन नियंत्रणात मदत करते
बडीशेपमधील फायबर पोट भरल्यासारखं वाटायला लावतो, त्यामुळे खाण्याची अनाठायी इच्छा कमी होते. जेवणानंतर अर्धा चमचा हिरवी बडीशेप चघळल्याने स्नॅक्स खाणं टळतं आणि वजन नियंत्रणात राहतं. -
नैसर्गिक माउथ फ्रेशनर
बडीशेप तोंडाची दुर्गंधी दूर करते. रासायनिक माउथ फ्रेशनर्सऐवजी नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय म्हणून बडीशेप उपयोगी ठरते, ती पचन सुधारते आणि श्वास ताजा ठेवते.

Vadodara Bridge Collapse : गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला, अनेक वाहनं नदीत पडली, ९ जणांचा मृत्यू