-
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि ऑटोमेशनचा झपाट्याने वाढत चाललेला वापर अनेक क्षेत्रांत मानवी कामगिरीची जागा घेत आहे. मात्र, काही विशिष्ट मानवी कौशल्ये अशी आहेत की ती कोणतीही मशीन पूर्णपणे बदलू शकत नाही. ही कौशल्ये व्यक्तिमत्त्व, भावना आणि निर्णयक्षमतेशी संबंधित असल्यामुळे त्यांची उपयुक्तता भविष्यातही तितकीच राहणार आहे. (फोटो सौजन्य : FreePik)
-
१. भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) AI डेटा ओळखण्यात तरबेज असली तरी ती माणसांमधील भावना समजून घेण्यात कमी पडते. सहकार्य, सहवेदना आणि नातेसंबंध जपण्यासाठी लागणारी भावनिक बुद्धिमत्ता ही केवळ मानवाकडे असते. नेतृत्व किंवा टीम मॅनेजमेंटमध्ये हे कौशल्य अतिशय महत्त्वाचे ठरते. (फोटो सौजन्य : FreePik)
-
२. सर्जनशीलता (Creativity) कलात्मक दृष्टी, नवे कल्पनाशक्तीपूर्ण विचार आणि सर्जनशील दृष्टिकोन या गोष्टी AI सहज निर्माण करू शकत नाही. चित्रकला, संगीत, लेखन, मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांत मानवी सर्जनशीलता अनमोल आहे. मशीन आधीच्या डेटावर काम करते, पण नवीन कल्पना माणूसच तयार करू शकतो. (फोटो सौजन्य : FreePik)
-
३. गंभीर विचार आणि निर्णयक्षमत्ता (Critical Thinking & Judgment) AI केवळ उपलब्ध माहितीनुसार निष्कर्ष काढते, पण चुकीची किंवा अपूर्ण माहिती असेल तर मानवी विचारशक्ती अधिक उपयुक्त ठरते. गुंतागुंतीच्या निर्णयप्रक्रियेत योग्य आणि नैतिक निर्णय घेण्यासाठी माणसाची समज आणि अनुभव आवश्यक असतो. (फोटो सौजन्य : FreePik)
-
४. नेतृत्वगुण (Leadership Skills) एकत्र काम करणाऱ्या संघाला प्रेरणा देणे, संकटकाळात निर्णय घेणे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणे यासाठी नेतृत्वगुण महत्त्वाचे असतात. एआय संघाचे मनोबल वाढवू शकत नाही किंवा मानवी संबंध नीट सांभाळू शकत नाही. (फोटो सौजन्य : FreePik)
-
५. सांघिक सहकार्य आणि संवादकौशल्य (Teamwork & Communication) उत्तम संवाद आणि विश्वास ही कोणत्याही यशस्वी संघाची गुरुकिल्ली असते. AI माहिती देऊ शकते, पण माणसामधील नाते, विनोद किंवा शाब्दिक-पार्श्वभूमीचा अर्थ लक्षात घेऊन संवाद साधणे हे त्याच्या आवाक्याबाहेर आहे. (फोटो सौजन्य : FreePik)
-
कौशल्य वाढवण्याचे मार्ग या कौशल्यांचा विकास करणे शक्य आहे. उदाहरणार्थ, भावनिक बुद्धिमत्तेसाठी ध्यानधारणा, सर्जनशीलतेसाठी विविध कला किंवा लेखन आणि नेतृत्वगुणांसाठी स्वयंप्रेरित प्रकल्प किंवा स्वयंसेवा उपयुक्त ठरते. अनुभव आणि सातत्याने आत्मपरीक्षण केल्यास ही कौशल्ये अधिक प्रभावी बनतात. (फोटो सौजन्य : FreePik)
-
भविष्याच्या तयारीसाठी सज्ज व्हा AI आणि मानवी शक्ती यांची सांगड घालणे हेच भविष्यातील यशाचे सूत्र ठरणार आहे. केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे तर मानवी कौशल्येही विकसित करणे तितकेच आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : FreePik)
-
नोकरी टिकवायची असेल तर ‘ही’ कौशल्ये जोपासा जग झपाट्याने बदलत असताना नोकरीतील स्थैर्य राखण्यासाठी वरील पाच कौशल्ये महत्त्वाची आहेत. या क्षेत्रात लक्ष केंद्रित केल्यास तुम्ही कोणत्याही तांत्रिक युगात टिकून राहू शकता. (फोटो सौजन्य : FreePik)

Vadodara Bridge Collapse : गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला, अनेक वाहनं नदीत पडली, ९ जणांचा मृत्यू