-
मधुमेहींसाठी दही खाणं योग्य की अयोग्य?
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असतं. अनेकदा लोक दही खाणं टाळतात, पण तज्ज्ञ सांगतात की योग्य प्रमाणात घेतल्यास दही हे मधुमेहींसाठी एक आरोग्यदायी पर्याय ठरतो. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. -
मधुमेहींसाठी दही खाणं योग्य की अयोग्य?
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असतं. अनेकदा लोक दही खाणं टाळतात, पण तज्ज्ञ सांगतात की योग्य प्रमाणात घेतल्यास दही हे मधुमेहींसाठी एक आरोग्यदायी पर्याय ठरतो. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. -
दह्याचा GI कमी – साखर वाढत नाही झपाट्याने
दह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे २८ इतका कमी असतो, त्यामुळे ते खाल्ल्यानंतर रक्तातील साखर हळूहळू वाढते. दह्यातील भरपूर प्रथिने कार्बोहायड्रेट्सचं शोषण कमी करतात, ज्यामुळे साखरेची पातळी संतुलित राहते. -
प्रोबायोटिक्स – आतड्यांसाठी आणि साखरेसाठी फायदेशीर
दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स हे आतड्यांचे आरोग्य सुधारतात. आरोग्यदायी आतडे रक्तातील साखरेचं नियंत्रण राखण्यात मदत करतात. संशोधनानेही सिद्ध केलं आहे की हे प्रोबायोटिक्स ग्लुकोज चयापचय सुधारण्यास मदत करतात. -
मधुमेहींसाठी दही का उपयुक्त आहे?
दह्यामध्ये भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि सतत खाण्याची गरज वाटत नाही, यामुळे वजन नियंत्रणात राहायला मदत होते, जे मधुमेहींसाठी खूप महत्त्वाचं आहे. -
मधुमेही व्यक्तींनी किती दही खावे?
मधुमेही रुग्णांनी दिवसातून २ ते ३ वाट्या दही खाणे फायदेशीर ठरू शकते. पण, गोड दही टाळा. त्यात साखर मिसळलेली असल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. -
संतुलित आहारात दह्याचा समावेश कसा करावा?
वजन कमी करायचं असल्यास, कमी चरबीयुक्त किंवा फॅट-फ्री दही निवडा. जास्त फॅट असलेल्या दह्यात आरोग्यासाठी चांगल्या चरब्या असतात, पण त्याचा अतिरेक इन्सुलिन प्रतिकार वाढवू शकतो. दही तुम्ही फळं, सुकामेवा किंवा फायबरयुक्त पदार्थांबरोबर खाऊ शकता. -
रात्री दही खाणं योग्य की नाही?
आयुर्वेदानुसार, रात्री दही खाल्ल्याने कफ वाढतो आणि पचन मंदावते. पण, काही तज्ज्ञ रात्री दही खाणं चालतं असं मानतात. अशावेळी दह्यात थोडी भाजलेली जिरे पावडर, काळी मिरी किंवा सैंधव मीठ घालून खाल्लं तर अधिक चांगलं.

जैन मंदिर बेकायदाच! पाडण्याची कारवाई योग्य; न्यायालयाचा निर्वाळा