-
सकाळचं चहा-कॉफीचं काम उरकायला साखरदाणी उघडली… आणि पाहिलं तर आत मुंग्यांची रांगच लागलेली. ही फक्त एक त्रासदायक गोष्ट नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरातील स्वच्छतेबाबतचा तो एक मोठा इशाराच असतो. मुंग्या कुठल्याही गोड वासाने आकर्षित होतात, हे खरंच आहे; पण त्या सहजासहजी दिसत नाहीत. त्या फक्त तेव्हाच येतात, जेव्हा तुमच्या किचनमध्ये स्वच्छतेचा अभाव असतो. (Photo-Freepik)
-
तुमच्या साखर, पीठ, डाळी अशा वस्तू जर व्यवस्थित बंद करून ठेवल्या नसतील किंवा त्या वस्तू ज्यामध्ये ठेवल्यात, त्याचे प्लास्टिक झाकण सैल लावले गेले असेल, तर मुंग्यांसाठी ते सरळ आमंत्रणच ठरतं. त्यांच्या वास घेण्याच्या शक्तीमुळे अगदी लहान गोडसर तुकडे किंवा बारीक साखरेचा कणही त्यांना तो नेमका पदार्थ साठवलेल्या ठिकाणापर्यंत नेण्यास वाट दाखविणारा ठरतो. त्यामुळे अशा वस्तू ठेवण्यासाठी हवाबंद डबे वापरणं ही मुंग्यांना टाळण्याची पहिली पायरी आहे. (Photo-Freepik)
-
मुंग्यांना आकर्षित करणाऱ्या पदार्थांचे स्वयंपाकघरात पडलेले तुकडे, द्रवरूपी थेंब आणि उरलेले खाद्यपदार्थ हे त्यांच्यासाठी भोज्याच असतं. एकदा का एका मुंगीनं एखादी जागा शोधली की, ती इतर मुंग्यांना वासाच्या खुणा करून तिकडे घेऊन जाते. म्हणूनच किचनचे ओटे, कोपरे, फ्रीजखालचा भाग आणि गॅसजवळचा भाग रोज पुसणं गरजेचं आहे. (Photo-Freepik)
-
कचराकुंड्या भरलेल्या, झाकण न लावलेल्या असतील, तर त्यातून येणाऱ्या अन्नाच्या वासाने मुंग्या लगेच तिकडे वळतात. त्यामुळे कचरा वेळेवर बाहेर टाका आणि कुंड्या स्वच्छ ठेवा. (Photo-Freepik)
-
ओलसर भाग जसे सिंकखालचा भाग, ओले कपडे, भिजलेले भांडी, हे फक्त मुंग्यांना नव्हे, तर अनेक कीटकांना आकर्षित करतात. त्यामुळे ओलसरपणा टाळा, गळती बंद करा आणि भांडी सुकवूनच ठेवावीत. (Photo-Freepik)
-
पॅन्ट्रीचे कोपरे, जुने डबे आणि मागचे रॅक अनेकदा महिन्यांपासून स्वच्छ होत नाहीत. तिथे साचलेले द्रवाचे गोडसर थेंब आणि उरलेले अन्नपदार्थ मुंग्यांसाठी जागाच ठरते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी डीप क्लीनिंग आवश्यक आहे. (Photo-Freepik)