-
प्रेम आणि विश्वास
पती-पत्नी असो की प्रियकर-प्रेयसी, कोणतेही नाते प्रेम व विश्वासावर टिकून असते. परंतु, अनेकदा भावनांची कमतरता असलेल्या नात्यांमध्येही दुरावा येतो. अशा वेळी नातं जपणं आणि ते अधिक घट्ट करणं गरजेचं असतं. (छायाचित्र: सोशल मीडिया) -
तुमचं नातं अजून घट्ट करायचं असेल, तर नातेविषयक तज्ज्ञ स्मृती आहुजा यांनी सांगितलेल्या ७ सोप्या टिप्स फॉलो करा. त्यांच्या म्हणण्यानुसार, या सवयी आत्मसात केल्यास तुमचं नातंही विराट कोहली आणि अनुष्का शर्मासारखं मजबूत होईल. (फोटो: फ्रीपिक)
-
शारीरिक आणि भावनिक प्रेम दाखवा
नातं मजबूत करण्यासाठी केवळ उरी भावना बाळगून चालत नाही, तर त्या व्यक्त करणेही गरजेचे आहे. प्रेम, आपुलकी व काळजी शब्द आणि कृतीतून दाखवा.ते करताना समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दलचा विश्वास अधिक गडद होतो. (छायाचित्र: फ्रीपिक) -
समजून घ्या आणि ऐका
नात्यात प्रेम हवे असेल, तर फक्त बोलणे पुरेसे नसते. समोरच्याचे शब्द, भावना व इच्छा शांतपणे ऐकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. असे केल्याने त्या व्यक्तीला सुरक्षिततेची भावना मिळते आणि तुमच्याशी संवाद साधण्याचा आत्मविश्वासही वाढतो. (छायाचित्र: फ्रीपिक) -
छोट्या घटनांमध्ये मोठा आनंद शोधा
तुमचा जोडीदार छोट्या गोष्टींमधून तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्या क्षणांचा खरा आनंद घ्या. त्याचे कौतुक करा आणि त्याचे प्रयत्न ओळखा. अशा हळुवार वागणुकीमुळे नातेबंध अधिक गहिरे होतात. (छायाचित्र: फ्रीपिक) -
बदल नाही; स्वीकार हवा
नात्यात समोरच्या व्यक्तीला बदलवण्याचा आग्रह नको. त्याच्या गुण-दोषांसह त्याला जसा आहे तसा स्वीकारा. हा स्वीकार त्याच्यात मोकळेपणाची भावना निर्माण करतो आणि तुमच्याबद्दलचा आदरही वाढवतो. (प्रतिमा: फ्रीपिक) -
संवाद तुटू देऊ नका
कधी मतभेद झाले तरी एकमेकांशी बोलणं थांबवू नका. कारण- संवाद थांबला की, गैरसमज वाढतात. बोलून सगळं स्पष्ट करता आलं की, नातं अधिक मजबूत होतं. (प्रतिमा: फ्रीपिक) -
अवाजवी नियंत्रणाऐवजी स्वातंत्र्य द्या
आजच्या काळात प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याचं स्वातंत्र्य हवं असतं. तुमचा जोडीदार काय करतो, कुठे जातो यावर अवाजवी नियंत्रण ठेवू नका. थोडंसं मोकळं आयुष्य दिलं, की विश्वास आपोआप वाढतो. (छायाचित्र: फ्रीपिक) -
संयम ठेवा
नातं मजबूत करायचं असेल, तर संयम फार महत्त्वाचा असतो. प्रेम, समजूत, विश्वास या सगळ्या गोष्टी वेळेनुसार वाढतात; फक्त थोडा संयम आणि सातत्य ठेवणं गरजेचं असतं. (प्रतिमा: फ्रीपिक)

आमचा निकाह झाला, आता सुखाने जगू द्या; मुस्लिम प्रेमियुगुल मुख्यमंत्र्यांच्या ‘गृह’ जिल्ह्यात आश्रयाला