-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या संयोगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ग्रहांची चाल ठरावीक वेळेच्या अंतराने बदलते. त्यामुळे अनेक शुभ योग आणि राजयोग जुळून येतात.
-
यंदाच्या ऑगस्ट महिन्यात एक असा योग तयार होतोय, जो तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा निर्माण होतोय.
-
हा योग म्हणजे ‘नवपंचम राजयोग’ जो शनी आणि बुध यांच्या संयोगातून तयार होतोय. विशेष बाब म्हणजे या योगाचा तीन भाग्यवान राशींच्या लोकांना जबरदस्त फायदा होणार आहे.
-
करिअर, पैसा, प्रतिष्ठा, यश आणि अचानक धनलाभ… सर्व काही एका झटक्यात मिळण्याची शक्यता आहे. पण कोणत्या आहेत त्या राशींचे लोक? जाणून घ्या…
-
नवपंचम राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन येतोय. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतील. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकते. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. सुख, सोई आणि सुविधा वाढू शकतील.
-
नवपंचम राजयोग वृषभ राशीच्या मंडळींसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारा ठरू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकेल. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नवीन संधी मिळू शकेल.अडकलेले पैसे मिळू शकतात. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन उंची गाठू शकाल. दाम्पत्य जीवन सुखमय राहील.
-
नवपंचम राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकतो. या काळात व्यापारात नवीन सौदे होऊ शकतात. बेरोजगारांसाठी नोकरीची नवीन संधी निर्माण होऊ शकते.व्यवसायात नवीन करार किंवा भागीदारीतून नफा होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांचा पगार वाढू शकतो. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. भौतिक सुख मिळू शकते.
-
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पडळकर-आव्हाड राड्याचे सभागृहात पडसाद, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून मोठी कारवाई