-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. या परिवर्तनाच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळतो, तर काही राशीच्या व्यक्तींना अडचणींना समोरे जावे लागते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या ऑगस्ट महिन्यात सूर्य कर्क त्यानंतर सिंह राशीत विराजमान असेल. तसेच गुरू आणि शुक्र आधी मिथुन आणि नंतर कर्क राशीत प्रवेश करतील. याव्यतिरिक्त मंगळ कन्या राशीत राहील आणि शनी मीन राशीत वक्री असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीमध्ये विराजमान असेल. तसेच या महिन्यात बुध ग्रह मार्गी आणि अस्त होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
ऑगस्ट महिन्यातील ग्रहांची ही स्थिती खूप अनुकूल सिद्ध होईल. ग्रहांचे हे गोचर कोणत्या राशीसाठी अधिक लाभदायी ठरेल हे जाणून घेऊ (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ऑगस्ट महिन्यातील ग्रहांचे गोचर मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम असेल. या दिवशी केलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ऑगस्ट महिन्यातील ग्रहांचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठीही खूप लाभकारी असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
तूळ राशीसाठीही ग्रहांचे गोचर दिवस खूप खास असेल. या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल, तणावमुक्त व्हाल. आयुष्यात मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल. आकस्मिक धनलाभ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींसाठीही ऑगस्टमधील ग्रहांचे गोचर अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या लोकांसाठीही ऑगस्ट महिना आनंदात जाईल. या काळात अनेक आनंदी वार्ता कानी पडतील, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश