-
आजकाल प्रत्येक बँक रिवॉर्ड्स आणि ऑफर्स असलेले क्रेडिट कार्ड ऑफर करताना दिसत आहेत. एक क्रेडिट कार्ड ठेवावे की जास्त? एक किंवा त्यापेक्षा जास्त कार्ड असण्याचे फायदे आणि तोटे आपण समजून घेऊया.
-
बॅकअप कार्ड असावे
जर तुमचे एक कार्ड कोणत्यातरी कराणामुळ चालत नसेल तर दुसरे कार्ड गरजेला पडू शकते. अडचणीच्या काळात बॅकअप कार्ड फायदेशीर ठरू शकते. -
जास्त कार्ड- जास्त रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक
प्रत्येक कार्डची वेगळी खासियत असते, कोणत्या कार्डवर पेट्रोलवर ऑफर मिळते तर एखाद्यावर ट्रॅव्हलवर. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या खर्चावर जास्त रिवॉर्ड्स मिळवण्याठी एकापेक्षा जास्त कार्ड फायदेशीर ठरू शकतात. -
क्रेडिट लिमिट वाढल्याने क्रेडिट स्कोर सुधारतो?
एकापेक्षा जास्त कार्ड्स असल्याने एकूण क्रेडिट लिमिट वाढते. यामुळे तुमचा क्रेडिट युटिलायजेशन रेशो कमी राहतो. आणि CIBIL स्कोर सुधारतो. -
अधिक ऑफर, अधिक बचत
वेगवेगळ्या बँकांच्या कार्डवर EMI, कॅशबॅक आणि डिस्काउंट दिले जातात, त्यामुळे तुम्ही एकाच कार्डपुरते राहिलात तर तुम्हाला इतर अनेक ऑफर मिळणार नाहीत. -
वेगवेगळ्या बिलिंग सायकलमुळे फायदाही होतो आणि धोकाही
प्रत्येक बिलाची डेट वेगळी असते, ज्यामुळे त्यांच्या पेमेंटचे नियोजन सोपे होऊन जाते. पण जर तुम्ही तारीख विसरलात तर लेट फीस आणि व्याजाचा जोरदार फटका सहन करावा लागू शकतो. -
जास्त कार्ड्स असतील तर नियोजन काटेकोर हवे
प्रत्येक कार्डटी ड्यू डेट, इंटरेस्ट रेट, लेट फीस ट्रॅक करणे कठीण जाऊ शकते. एकही चूक महागात पडू शकते. -
खर्च करण्याच्या सवयीवर नियंत्रण आवश्यक
अनेकदा लोक जास्त कार्ड असल्याने लिमिटच्या पुढे जाऊन खर्च करू लागतात. उधारी वाढते आणि व्याज देखील, यामुळे तुम्हा आर्थिक संकटात येऊ शकता. -
तज्ज्ञ काय सांगतात
आर्थिक सल्लागारांच्या मते २ ते ३ कार्ड पुरेसे ठरतात. करत आणि पैसे फेडण्याची क्षमता याचा विचार करून कार्ड घ्या. -
काय काळजी घ्यावी
प्रत्येक कार्डचे रिवॉर्ड्स आणि ड्यू डेट यांची माहिती ठेवा. ऑटो-डेबिट सेट करा किंवा थेट रिमांयडर सेट करून ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या सवयी कशा आहेत हे लक्षात घ्या.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल