-
नवीन नोकरीचा पहिला दिवस. ओळखीचे कोणी नाही, वातावरण अनोळखी आणि मनात एक हलकासा तणाव… पण त्याच वेळी आशा, उत्साह आणि काहीतरी सिद्ध करण्याची आतून येणारी जिद्द. अशा क्षणी, सुरुवात जरी लहान वाटत असली तरी योग्य पावलं उचलली, तर हीच सुरुवात यशाची दिशा ठरू शकते. (फोटो सौजन्य : Pexels)
-
नवीन नोकरी म्हणजे केवळ कामाची सुरुवात नाही, तर स्वतःच्या वाढीची आणि संधींची वाटचालदेखील आहे. ‘या’ काही गोष्टी लक्षात घेतल्यास तुम्ही चांगलं काम तर करालच; पण तुमचं ठसठशीत अस्तित्वही निर्माण करू कराल. (फोटो सौजन्य : Pexels)
-
सुरुवात माहिती घेण्याने करा : नवीन नोकरीत पहिल्याच दिवशी सगळं कळेल, असं नाही. म्हणूनच प्रत्येक गोष्ट समजून घ्या, नोंदी ठेवा आणि शिकण्याची तयारी ठेवा. (फोटो सौजन्य : FreePik)
-
ऐका आणि योग्य वेळी बोला : सुरुवातीला वातावरण समजून घेणं गरजेचं असतं; पण वेळ आल्यावर आपल्या कल्पना आणि विचार मांडले, तर तुमचं योगदान स्पष्ट होतं. (फोटो सौजन्य : FreePik)
-
संवाद प्रभावी ठेवा : तुमचं वागणं, बोलणं आणि काम करण्याची पद्धत इतरांवर परिणाम करते. त्यामुळे सुरुवातीलाच नीट संवाद साधा. (फोटो सौजन्य : Pexels)
-
सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण नातं ठेवा : काम हे व्यावसायिक असलं तरी चांगल्या नात्यांची गरज असतेच. सहकाऱ्यांशी मनमोकळा संवाद ठेवा. त्यामुळे टीमवर्क मजबूत होईल. (फोटो सौजन्य : Pexels)
-
नियमित अपडेट द्या : आपलं काम योग्य दिशेने चाललंय का, हे जाणून घेण्यासाठी वेळोवेळी मॅनेजरशी चर्चा करा. त्यामुळे औअपेक्षा स्पष्ट होतील. (फोटो सौजन्य : Pexels)
-
या गोष्टी केवळ तुमचं काम सोपं करणार नाहीत, तर तुमचं अस्तित्वही ठळकपणे निर्माण करतील. त्यामुळे लहान लहान पावलं टाका; पण ती वाटचाल तुम्ही आत्मविश्वासानं करणे गरजेचे आहे. कारण- यशाची दिशा ही सुरुवातीच्या पावलांतच ठरत असते. (फोटो सौजन्य : Pexels)

“ED बद्दल महाराष्ट्रात वाईट अनुभव, आता…”, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; सरन्यायाधीश म्हणाले, “तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…”