-
नितळ चेहरा असलेली व्यक्ती कुणाला आवडत नाही? चेहऱ्यावर एकही डाग नसेल तर सौंदर्यात भर पडतेच. (सर्व फोटो सौजन्य-Freepik )
-
अनेकदा चेहऱ्यावर तारुण्य पिटिका, पुटकुळ्या यामुळे चेहऱ्यावर डाग पडतात. हे डाग कसे घालवायचे याचे सोपे उपाय आम्ही सांगत आहोत.
-
बटाटाच्या काप किंवा बटाट्याचा रस हा चेहऱ्यांवरच्या डागांवर गुणकारी उपाय आहे. तो रस पाच ते सहा दिवस किंवा बटाट्याचे काप त्वचेवर चोळल्याने चेहरा उजळतो आणि चेहऱ्यावरचे डाग कमी होण्यास मदत होते.
-
अॅलो वेरा अर्थात कोरफडीचा रस किंवा कोरफडीचं जेल यामुळेही चेहऱ्यावरचे डाग कमी होण्यास मदत होते. अॅलोवेरामध्ये चेहऱ्यावरचे डाग घालवणारे घटक आहेत. त्यामुळे नितळ चेहऱ्यासाठी कोरफड अतिशय उपयुक्त आहे.
-
हळदीची पेस्ट ही देखील चेहऱ्यावरच्या डागांसाठी गुणकारी आहे. हळदीत साय मिसळून चेहऱ्याला लावा, त्यानंतर अर्ध्या तासाने चेहरा धुवा आणि वाफ घेऊन चेहरा गार पाण्याने धुवा. हा उपाय नियमितपणे केल्यास चेहरा उजळण्यास मदत होते.
-
ग्रीन टीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात. जे तुमचा ताण कमी करण्यास मदत करतात. ग्रीन टी प्यायल्यानंतर टी बॅग फेकून देऊ नका. थंड झालेला ग्रीन टी चेहऱ्याला लावा आणि थोड्यावेळाने चेहरा धुवा. या उपायानेही चेहऱ्यावरचे डाग कमी होण्यास मदत होऊ शकते. (लोकसत्ता ऑनलाइनने दिलेली ही माहिती सोशल मीडियाच्या आधारे मिळालेली आहे. आम्ही कुठलाही दावा करत नाही.)
-
Appale Cider Vinegar हा देखील चेहऱ्यांवरच्या डागाचा महत्त्वाचा उपाय आहे. चेहऱ्यावर डाग पडले असतील तर ते दूर करण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडं Appale Cider Vinegar घ्या. त्यानंतर पाच मिनिटं वाट बघा आणि चेहरा धुऊन टाका. हे उपाय करुन तुम्ही तुमचा चेहरा नितळ ठेवू शकता.

“आम्ही तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू”, अमेरिकन सिनेटरचा भारताला इशारा; ‘या’ देशांचाही केला उल्लेख!