-
महिलांमध्ये केसगळती ही एक सामान्य; पण चिंताजनक समस्या बनली आहे. त्यामागे हार्मोनल बदल, ताणतणाव, पर्यावरणीय कारणे तर असतातच. पण, अनेकदा शरीरातील काही महत्त्वाच्या पोषण घटकांची कमतरता हेही मुख्य कारण असते. खालील सात जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची पातळी शरीरात कमी झाल्यास केसगळती सुरू होऊ शकते: (फोटो सौजन्य : FreePik)
-
आयर्न (Iron) शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यास ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, ज्याचा परिणाम केसांच्या वाढीवर होतो. महिलांमध्ये आयर्नची कमतरता ही अतिशय सामान्य आहे, विशेषतः मासिक पाळीमुळे. (फोटो सौजन्य : FreePik)
-
व्हिटॅमिन D व्हिटॅमिन D शरीरातील अनेक कार्यांमध्ये महत्त्वाचे असते. त्याचा अभाव झाल्यास केसांच्या कुपिका (follicles) कमकुवत होतात आणि केसांची वाढ खुंटते. (फोटो सौजन्य : FreePik)
-
झिंक (Zinc) झिंक हे केसांच्या उतींच्या दुरुस्तीमध्ये मदत करते. झिंकची कमतरता झाल्यास केस कोरडे, कमजोर आणि तुटणारे येतात. (फोटो सौजन्य : FreePik)
-
बायोटिन (Vitamin B7)
बायोटिन ही बी कॉम्प्लेक्स ग्रुपमधील एक महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. तिची कमतरता केसगळती, कोरडे केस आणि टोकांना फाटण्यास कारणीभूत ठरते. (फोटो सौजन्य : FreePik) -
व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ए हे टाळूला आवश्यक नैसर्गिक तेल (सीबम) तयार करण्यात मदत करते. मात्र, याचे प्रमाण जास्त झाल्यासही केस गळू शकतात. त्यामुळे संतुलन आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : FreePik)
-
व्हिटॅमिन E हे अँटीऑक्सिडंट जीवनसत्त्व आहे. त्वचेचा व टाळूचा रक्तप्रवाह सुधारतो आणि त्यामुळे केसांना पोषण मिळते. (फोटो सौजन्य : Pexels)
-
प्रोटीन केस प्रोटीनपासून बनलेले असतात. शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास केसांची वाढ थांबते आणि केस गळतात. (फोटो सौजन्य : FreePik)
-
महिलांनी काय करावे? रक्ताची नियमित चाचणी करून या पोषण घटकांची पातळी तपासून घ्या. संतुलित आहार घ्या – हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळी, अंडी, मासे, दूध यांचा समावेश करा. आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्या. (फोटो सौजन्य : FreePik)
-
टीप : केसगळती ही केवळ सौंदर्याची समस्या नाही, तर तो अंतर्गत आरोग्याशी संबंधित गंभीर इशारा असू शकतो. त्यामुळे वेळेवर लक्ष देणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : FreePik)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत