-
प्रत्येक व्यक्तीला त्वचेच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. सनबर्न, टॅनिंग, मुरुमे, डाग, कोरडी त्वचा इत्यादी समस्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो,यात आता रक्षाबंधनानिमित्त पार्लरमध्ये न जाता तुम्ही घरीच कमी वेळात तुमचा चेहरा चमकदार, तुळतुळीत करु शकता.
-
त्वचेवरील काळे डाग दूर करण्यासाठी अनेक रासायनिक उत्पादने, उपचार आणि विविध क्रीम उपलब्ध आहेत. पण तुमचा खिसा रिकामा करणाऱ्या अशा उपायांऐवजी, घरी नैसर्गिक पदार्थ वापरून ब्लीच तयार करू शकता, जे काळे डाग दूर करण्यास मदत करते आणि तुमच्या चेहऱ्याची चमक पुन्हा आणते.
-
तांदळाचे पीठ, बटाटा आणि दूध वापरा. हर्बल ब्लीच बनवण्यासाठी बटाटे सोलून किसून घ्या. नंतर त्यांचा रस गाळून बाजला ठेवा. एका भांड्यात तांदळाचे पीठ घ्या, त्यात बटाट्याचा रस आणि दूध घाला आणि चांगले मिसळा. हे मिश्रण चेहरा स्वच्छ करन लावा आणि २० मिनिटे तसेच राहू द्या. चांगले सुकल्यानंतर ते थंड पाण्याने धुवा.
-
तांदळाचे पीठ: तांदळाचे पीठ एक नैसर्गिक स्क्रबर आहे. ते मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचा चमकदार दिसते, सुरकुत्या आणि डाग नाहीसे होतात.
-
दूध : दुधातील लॅक्टिक अॅसिड त्वचेवरील अकाली वृद्धत्वाची लक्षणे दूर करू शकते. दुधाचा वापर त्वचेला टवटवीत आणि उजळ करण्यासाठी केला जाऊ शकतो. तर बटाटा त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून काम करतो. यामुळे त्वचेवरील डाग, मुरुम नाहीसे होतात.

‘एचएसआरपी’ नंबर प्लेटबाबत मोठी बातमी; आता तांत्रिक दोष आल्यास वाहन विक्रेत्यांकडून…