-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, चंद्राने १२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी मीन राशीत प्रवेश केला असून तो या राशीत १४ ऑगस्टपर्यंत राहील. चंद्राच्या मीन राशीतील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींचे नशीब चमकेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा मीन राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीतच चंद्राचा प्रवेश होणार आहे, त्यामुळे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. आर्थिक समस्या दूर होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चंद्राचा मीन राशीतील प्रवेश वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दादरमध्ये झाड कोसळून ‘सलमान खान’ जखमी…