-
ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिना अत्यंत खास असणार आहे. कारण- या महिन्यात नवग्रहातील काही ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होणार आहे.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, १३ सप्टेंबर रोजी मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. याचदरम्यान, मंगळ चित्रा आणि स्वाती नक्षत्रात गोचर करेल. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी सूर्य सिंह राशीतून कन्या राशीमध्ये जाईल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
तसेच बुध ग्रह सप्टेंबर महिन्यात सिंह आणि कन्या राशीत गोचर करेल आणि मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त आणि चित्रा नक्षत्रात गोचर करेल. तसेच दैत्यगुरू शुक्राचार्य कर्क आणि सिंह राशीत राहतील आणि आश्लेषा, मघा आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये गोचर करतील.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
देवगुरू बृहस्पती संपूर्ण महिना मिथुन आणि पुनर्वसु नक्षत्रामध्ये राहील. तसेच शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आणि उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये गोचर करेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
केतू सिंह राशीसह पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात राहतील. तसेच राहू कुंभ राशीसह पूर्वाफाल्गुवू नक्षत्रात विराजमान असेल. या ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास असणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. त्यांची अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशींच्या व्यक्तींसाठीही मे महिना खूप खास असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी, व्यवसायामध्ये यश मिळेल; तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशींच्या व्यक्तींसाठीही हा महिना खूप उत्तम सिद्ध होईल. या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल. शुभ ग्रहाच्या युतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम