-
फायबरयुक्त आहार हा पचनक्रियेसाठी एक उत्तम मानला जातो. मात्र, तुम्हाला माहित आहे का की जास्त फायबरयुक्त आहार घेतल्याने बद्धकोष्ठता कमी होण्याऐवजी उलट परिणाम होऊ शकतो आणि बद्धकोष्ठता निर्माण होऊ शकते? याविषयी आहारतज्ञ कनिक्का मल्होत्रा यांनी महत्वाचं माहिती सांगितली आहे. (फोटो स्रोत-कॅनव्हा)
-
“फायबर तुमच्या आतड्यांमधील गोष्टींना पुढे जाण्यासाठी मदत करते. मात्र, जास्त प्रमाणात, विशेषतः पाण्याशिवाय, शरीरातील प्रणालीला अडथळा आणू शकते,” असं मल्होत्रा यांनी म्हटलं. (फोटो स्रोत-कॅनव्हा)
-
“जास्त फायबरमुळे मल मोठ्या प्रमाणात वाढतो. जर तुम्हाला त्याची सवय नसेल किंवा तुम्ही पुरेसे पाणी पीत नसाल, तर यामुळे कठीण आणि मोठे मल होऊ शकतात जे बाहेर पडणे कठीण असते.” (फोटो स्रोत-कॅनव्हा)
-
“जर तुमचे पोट अचानक जास्त फुगले असेल, गॅस झाला असेल किंवा जास्त फायबरयुक्त आहार घेतल्यानंतर तुम्हाला अशी समस्या जाणवत असेल, तर तुमचे शरीर तुम्हाला संकेत देत आहे असं समजा”,असंही त्यांनी म्हटलं. (फोटो स्रोत-कॅनव्हा)
-
“हायड्रेशन महत्वाचं आहे. पुरेशा द्रवपदार्थांशिवाय फायबर तुमच्या आतड्यांमध्ये स्पंजसारखं काम करतं. ओलावा शोषून घेतं आणि त्यामुळे पचनाची प्रक्रिया मंदावते”, असंही त्यांनी म्हटलं. (फोटो स्रोत-कॅनव्हा)
-
“शून्यावरून लगेच हिरो होऊ नका. तुम्ही काही आठवडे हळूहळू फायबर घ्या. जेणेकरून तुमच्या आतड्यांनाही त्याची सवय होईल”, असं मल्होत्रा यांनी म्हटलं. (फोटो स्रोत-कॅनव्हा)
-
मल्होत्रा यांनी पुढे म्हटलं की, “दीर्घकालीन बद्धकोष्ठता असलेल्या काही लोकांना फायबर कमी केल्यावर बरं वाटतं. हो, कमी करा! पण काही प्रकरणांमध्ये संशोधन याला समर्थन देतं.” (फोटो स्रोत-कॅनव्हा)
-
“संपूर्ण कड धान्य आणि शेंगा हे फायबरचं भंडार आहेत. मात्र, जर तुमची पचनक्रिया त्यासाठी तयार नसेल तर ते आतड्यांसाठी तुम्हाला त्रासदायकही ठरू शकतं हे ही लक्षात घ्या”, असंही मल्होत्रा यांनी म्हटलं. (फोटो स्रोत-कॅनव्हा)
-
“जर तुम्ही योग्य आहार घेत असाल तरीही तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर योग्य आहारतज्ञांचा सल्ला घ्या”, असा सल्लाही आहारतज्ञ मल्होत्रा यांनी दिला.(फोटो स्रोत-कॅनव्हा)

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”